लसीकरणाचे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांना ओव्हर अ‍ॅक्टिंग न करण्याचा दिला अभिनेत्री आशा नेगीने सल्ला

0
260

देशात अनेक ठिकाणी 18 वर्षांवरील सर्वांसाठी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी देखील करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो तसचं व्हिडीओ शेअर करत या सेलिब्रिटींनी लस घेतल्याची माहिती दिली आहे. सोबतच अनेकांनी चाहत्यांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

मात्र लसीकरणाचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या कलाकारांना अभिनेत्री आशा नेगीने फटकारलं आहे. आशाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये ती म्हणाली, “लसीकरणाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्य़ा प्रत्येकासाठी, जागरुकतेसाठी ठीक आहे. पण कृपा करून इतकी ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका ते खूप त्रासदायक वाटतं” असं म्हणत आशाने व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

यासोबतच कॅप्शनमधूनही तिने व्हिडीओ शेअर करणाऱ्या कलाकारांचा खरपूस समाचार घेतला आहे. तिने लिहिलंय, ” प्लिज यार..आणि हा लोक विचारत आहेत व्हिडीओग्राफर स्वत: घेऊन जाता की रुग्णालयाकडून पुरवला जातो.” असं आशा म्हणाली आहे. आशाच्या या पोस्टवर अनेक टेलिव्हिजन कलाकारांनी कमेंट करत तिच्या पोस्टला पसंती दिली आहे.