श्रीलंकेत होणारी आशिया कप २०२१ स्पर्धेचं आयोजन रद्द

0
178

पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवण्यात आलेली आशिया कप क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. मागील आशिया कप स्पर्धा २०१८ मध्ये पार पडली होती. यंदा ही स्पर्धा जूनमध्ये श्रीलंकेत होणार होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या परिस्थितीत आशिया कपचे आयोजन करणे शक्य नसल्याचे श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅशली डी सिल्वा यांनी स्पष्ट केले.

करोना व्हायरसचं संकट पाहता आम्ही स्पर्धेचं आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढचे दोन वर्ष ही स्पर्धा होणार नाही. कारण आशिया कपमधील संघाचं दोन वर्षांचं नियोजन ठरलं आहे. त्यामुळे २०२३ विश्वचषकानंतर या स्पर्धेचं आयोजन होईल.’ असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डीसिल्वा यांनी सांगितलं.करोना व्हायरसचं संकट पाहता आम्ही स्पर्धेचं आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढचे दोन वर्ष ही स्पर्धा होणार नाही. कारण आशिया कपमधील संघाचं दोन वर्षांचं नियोजन ठरलं आहे. त्यामुळे २०२३ विश्वचषकानंतर या स्पर्धेचं आयोजन होईल.’ असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डीसिल्वा यांनी सांगितलं.

भारताने आतापर्यंत ७ वेळा आशिया कपवर नाव कोरलं आहे. १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ साली भारताने आशिया कप जिंकला आहे. २०१८ मध्ये आशिया कपचं आयोजन यूएईत करण्यात आलं होतं. २०१८ साली भारताने बांगलादेशला नमवून चषक आपल्या नावावर केला होता.

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुढील दोन वर्षांचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता, आशिया कप स्पर्धेच्या आयोजनासाठी २०२३ एकदिवसीय वर्ल्डकपआधी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. श्रीलंकेचा संघ लवकरच बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहेत. त्यानंतर जुलैमध्ये भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल.