पाऊस कसा मोजतात ? पाऊस का मोजतात ?

    0
    3171

    मान्सून पर्वाला सुरु झाली आहे. मुंबईमध्येही आजपासून पावसाला सुरुवात झाली असून आता किती पाऊस पडतोय यावर परिस्थिती अवलंबून असणार आहे. अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला, तमुक भागात तितका सेंटीमीटर पाऊस पडला! ही नेमकी भानगड काय आहे? पाऊस कसा मोजला जातो आणि तेही कशाप्रकारे याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

    पाऊस का मोजतात?
    वर्षभरात किती पाउस पडला यावरून पुढील वर्षी किती पाऊस पडेल आणि यावर्षीच्या मानाने गेल्या वर्षी किती पाऊस पडला होता याचा अभ्यास करण्यासाठी पाऊस मोजला जातो. पावसाचे कमी जास्त होणारे प्रमाण याविषयी यावरून अंदाज लावणे सोप्पे जाते.

    पाऊस कसा मोजतात?
    पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर ( litres per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत ‘मिलीमीटर’ तर ब्रिटीश पद्धतीत ‘इंच’ हे देखील एकेक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात

    पावसाची मोजणी होते तरी कशी ?

    पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर ( litres per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत ‘मिलीमीटर’ तर ब्रिटीश पद्धतीत ‘इंच’ हे देखील एकेक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात. पर्जन्यमापक यंत्राचे प्रकार पुढील प्रमाणे :

    रेकोर्डिंग पर्जन्यमापक-

    हे यंत्र स्वयंचलित असून याद्वारे नक्की किती पाऊस पडला याचा विश्वासार्ह अंदाज लावता येतो. पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते आणि पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेतून माहिती गोळा केली जाते. रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे स्वयंचलित असून; त्यामध्ये घडय़ाळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र (ग्राफ) आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल, इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो. या पर्जन्यमापकावर ठरावीक कालावधीत पडलेला पाऊस, तसेच पावसाची तीव्रतासुद्धा (मिलिमीटर/तास) मोजता येते. या पर्जन्यमापकाद्वारे पंधरवडय़ाचा एकूण पाऊसही मोजता येतो; म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या वापरासाठी माणसाची गरज नसते.

    नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक-
    नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोप्पे यंत्र असून याद्वारे निश्चित असं प्रमाण सांगता येत नसलं, तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. ही पद्धती भारतात मोठ्या प्रमाणात वापरता येते. या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ म्हटलं जातं. नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्के बसवलेले असते. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील २४ तासांतील पडलेल्या पावसाची उंची मोजता येते. पाऊस जमा करणारी बाटली साधारणत: १०० मिमी व्यासाची असते आणि ती १०० ते १२५ मिमी पाऊस जमा करते. मोठय़ा पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन -चार वेळा मोजणी करावी लागते.

    पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक ठेवताना, त्या ठिकाणापासून किमान ३० मीटरच्या त्रिज्येमध्ये झाड, इमारत इ. अडथळे नसावेत. सपाट प्रदेशामध्ये साधारणत: १०० चौरस किलोमीटर क्षेत्राच्या परिसरात किमान एक पर्जन्यमापक असण्याची गरज आहे. हिमवर्षांव मोजण्यासाठी नॉन रेकॉìडग स्नो गेजचा वापर केला जातो.