पुणे शहरात नवी नियमावली जाहीर; काय सुरू, काय बंद?

0
295

देशात आणि राज्यातही Delta Plus Variant चा नवा धोका निर्माण झालेला असताना केंद्र सरकारने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच असतील, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. पुणे शहरात आजपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर करण्यात आलीय. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावषक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यील सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यांसह पुणे शहरात नेमकं काय सुरू काय बंद राहणार याबाबत अधिक जाणून घेऊया.

डेल्टा, डेल्टा प्लससारख्या व्हेरिएंटमुळं करोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जुन्या नियमावलीमध्ये बदल केल्यानंतर पुणे महापालिकेनंही सुधारीत आदेश काढले आहेत. त्यानुसार, पुण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच वाजल्यानंतर संचारबंदी असेल. संचारबंदीच्या काळात पुणेकरांना केवळ अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे.

नव्या नियमावलीत काय सुरू, काय बंद?

  • सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यील सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार
  • अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद
  • मॉल्स, सिनेमागृहं संपुर्ण बंद
  • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा ११ पर्यंत
  • उद्याने, मैदाने, जॉजींग, रनींग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत
  • खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत
  • अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने सुरू राहतील
  • सामाजिक, धार्मिक किंवा मनोरंजनपर कार्यक्रमांना देखील फक्त सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्येच परवानगी असेल. यासाठी ५० लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. शनिवार-रविवार अशा कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी असणार नाही.