मायग्रेनचं दुखणं अत्यंत त्रासदायक असतं. मायग्रेन ही अशी एक समस्या आहे ज्यामध्ये तुमच्या डोक्याचा अर्धा भाग प्रचंड प्रमाणात दुखू लागतो. कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास जाणवतो. एकदा सुरू झाल्यावर काही मिनीटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत ही डोकेदुखी जाणवू शकते. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते.
मायग्रेनचे दोन प्रकार आहेत
मायग्रेनची लक्षणे आणि कारणे जाणून घेण्यापूर्वी त्याचे हे मुख्य दोन प्रकार समजून घ्या. कारण त्यामुळे त्यावर उपचार करणं सोपे जाईल.
क्लासिकल मायग्रेन आणि नॉन क्लासिकल मायग्रेन (Classical And Non-Classical Migraine)
क्लासिकल मायग्रेनमध्ये डोकेदुखी सुरू होण्याआधी काही लक्षणे जाणवतात. नॉन क्लासिकल मायग्रेनमध्ये मात्र अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. कोणत्याही प्रकारचा मायग्रेन असला तरी त्यावर डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधोपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे या डोकेदुखीवर कोणतेही पेनकिलर घेणं चुकीचे ठरेल.
कोणत्याही आजाराच्या लक्षणावरून त्यावर उपचार करणे सोपे जाते. यासाठी मायग्रेनची लक्षणे अवश्य जाणून घ्या:
1. भूक कमी लागणे
2. कामात रस न वाटणे
3. डोक्याचा अर्धा भाग दुखणे
4. घाम सुटणे
5. मळमळ, उलटी
6. प्रखर उजेड आणि तीव्र आवाज सहन न होणे
7. अशक्तपणा
8. डोळे दुखणे
9. धुसर दिसू लागणे
10. काही विशिष्ट खाद्यपदार्थांची अॅलर्जी असणे
मायग्रेन दूर करण्यासाठी उपाय:
- साजूक तूप – मायग्रेन कमी करण्यासाठी नियमित तुमच्या नाकपुडयांमध्ये दोन थेंब शुद्ध तूप टाका.
- लवंग पावडर – डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही दुधात लवंग पावडर मिसळून ते घेऊ शकता.
- सफरचंद – मायग्रेनच्या त्रासातून वाचण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक सफरचंद खा
- पालक आणि गाजराचा रस- मायग्रेनमुळे डोकं दुखत असेल तर पालक आणि गाजराचा रस घ्या.
- लिंबाची साले – लिंबाची साले सुकवून त्याची पावडर तयार करा. डोके दुखू लागल्यास या पावडरची पेस्ट कपाळावर लावा.ज्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकेल.
- आले – एक चमचा आल्याच्या रसात थोडं मध मिसळा. हे मिश्रण पाण्यात मिसळा आणि प्या. ज्यामुळे तुमची डोकेदुखी कमी होईल. त्यासोबतच आल्याचा चहा घेतल्यास अथवा आल्याचा एक तुकडा तोंडात ठेवल्यासदेखील तुम्हाला आराम मिळू शकेल. आल्याचा रस पोटात गेल्याने तुमची डोकेदुखी कमी होऊ शकेल. एवढचं नाहीतर तुम्ही आल्याच्या सालांचा वापर ही करू शकता.
- काकडी – काकडीचा रस डोक्यावर लावल्याने अथवा काकडीचा वास घेतल्याने तुमची डोकेदुखी कमी होईल
- द्राक्षाचा रस – ताजी द्राक्ष मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. डोकं दुखत असल्यास दिवसभरात दोन वेळा पाण्यासोबत हे सरबत प्या. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेड असतात ज्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळतो.
- आईस पॅक – एका स्वच्छ टॉवेलवर बर्फाचे काही तुकडे ठेवा आणि त्याने तुमचे डोकं, मान आणि पाठीला शेकवा. बर्फात काही थेंब पेपरमिंट ऑईल टाकल्यास तुम्हाला आणखी बरे वाटेल.
- तिळाचं तेल – तिळाच्या तेलात एक दालचिनीचा तुकडा आणि दोन वेलची टाका आणि तेल गरम करा. तेल कोमट झाल्यावर त्या तेलाने हेड मसाज करा. यामुळे तुमचे सिरोटोनिन वाढते ज्यामुळे तुमचे डोके दुखणं कमी होतं. तिळाचं तेल हे त्वचा आणि केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे.
- उपाशी राहू नका – मायग्रेनचा त्रास कमी व्हावा असे वाटत असेल तर जास्त वेळ उपाशी राहू नका.
- पुरेशी झोप घ्या – मायग्रेनचा त्रास असणाऱ्या लोकांनी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे.
- लिंबाच्या साली उन्हात सुकवा. आता या सालींची पेस्ट बनवा. ही पेस्ट कपाळावर लावा. या घरगुती उपायाने आराम मिळतो.
- बायोफिडबॅक, एक्युप्रेशर, योगासने आणि मेडीटेशनमुळे मन शांत राहण्यास मदत होते. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे योगासने आणि प्राणायमाचा सराव करा. शिवाय झोपताना अथवा झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनीटे केलेल्या मेडीटेशनमुळे तुम्हाला निवांत वाटू लागेल. यासाठी ही काही योगासने अवश्य करा. जोरात आवाज किंवा ताण-तणाव असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळा.