शाब्बास :शिरीषा बांदल अंतराळात झेपावली

0
254

अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन स्वत:च्या अंतराळ यानातून अंतराळात फेरफटका मारून परतले आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात धाडसी मोहिमेत भारतीय वंशाची शिरिषा बांदला त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक होती. अंतराळात जाणारी ती भारतीय वंशाची तिसरी महिला ठरली आहे.

ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ कंपनीच्या व्हीएसस युनिटी नावाच्या अंतराळयानाने न्यू मेक्सिकोतून उड्डाण केलं होतं. लहानपणी आकाशात पाहून तारे बघायचो आता मोठे झाल्यावर आकाशातून सुंदर अतिसुंदर अशी पृथ्वी पाहत असल्याचं रिचर्ड यांनी म्हटलं आहे.

भारतीय तरुणी सिरीशा 34 वर्षाची असून एरोनॉटिकल इंजिनियर आहे.सिरीशा चा जन्म भारतातीलआंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका गावात झाला आहे.तिनं इंडियानाच्या पर्ड्यू विश्वविद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.आणि टेक्सासच्या ह्यूस्टनं येथून तिचे शालेय शिक्षण झाले आहे. पहिल्यांदाच अंतराळाचा प्रवास करणार असलेल्या शिरीषावर राकेश शर्मा यांचा प्रभाव आहे. शिरीषा बांदला हिने अमेरिकेतील पड्र्यू विद्यापीठातून एमबीए केले. तसेच २०११ मध्ये तिने एअरोस्पेस, विमान उड्डाण प्रशिक्षण आणि अंतराळ अभियांत्रिकी शाखेतले शिक्षण पूर्ण केले. बुद्धिमत्ता आणि कौशल्य तपासून शिरीषा बांदला हिची अंतराळ मोहिमेसाठी निवड झाली आहे. शिरीषा ज्या मोहिमेत सहभागी होत आहे ती खासगी अंतराळ मोहीम आहे.