थाटामाटात गाण्याचे एकदम थाटामाटातच स्वागत; तरुणाईमध्ये या गाण्याने घातलाय धुमाकूळ

0
482

सध्याच्या काळात युवापिढीचा मनोरंजन क्षेत्राकडे चांगला कल दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात टिकटॉक बंद झाले तरी इन्स्टा रील असो किंवा युट्युब चॅनेल याकडे तरुणाईने मोर्चा वळवल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशाच काही तरुणांबद्दल आपण बोलतोय ज्यांनी मनोरंजन क्षेत्रासाठी नवीन काय करता येईल आणि त्यामध्ये काय करू शकतो याचा विचार करत जिगर मराठी ह्या नावाने एक युट्युब चॅनेल काढले आहे.

आदित्य सातपुते, विशाल फाले, मोहित सोमवंशी यांनी आपल्या डोक्यातील कल्पना कॅमेऱ्यातून गाण्यामध्ये उतरवली आहे. या जिगर मराठी चॅनेलच्या माध्यमातून नवनवीन तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उभारले आहे. थाटामाटात नावाने पहिलेच गाणे जिगर मराठीवर लाँच झाले असून तरुणाईला ह्या गाण्याची चांगलीच भुरळ पडली आहे. हे गाणे सर्वांच्या पसंतीस उतरले असून हे गाणे लवकरच वेगेवेगळे विक्रम करणार यात शंका नाही.

जिगर मराठी ह्या चॅनेलवरील थाटामाटात गाण्याचे अनावरण पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच संपन्न झाले असून ह्या गाण्यांवर तरुणाई सोबतच संपुर्ण महाराष्ट्र फिदा झाला आहे असे दिसत आहे. उद्योग, व्यवसायानंतर आता युवक चित्रपटनिर्मिती व संगीत क्षेत्रातही गगनभरारी घेत आहेत. अनेक दर्जेदार लघुपटांची व संगीत निर्मितीही होत असून युवा कलाकारांनी ‘हम किसी से कम नही’ म्हणत अनेक पुरस्कारप्राप्त निर्मिती करत आहेत. देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी तरुणांना स्वस्थ बसू देत नाही. आपलं म्हणणं, आपला विचार शॉर्टफिल् व गाणीमधून प्रभावीपणे मांडून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यातही तरुणाई आघाडीवर आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी पुणे येथे “थाटामाटात” या गाण्याच्या अनावरण( लॉन्च) प्रसंगी केले.

यावेळी आदित्य सातपुते, विशाल फाले, मोहित सोमवंशी व सानिका भोईटे , हिंदवी पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अंकिता पाटील यांनी युवकांनी आपल्या कौशल्यातून पुढे येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून सोशल मीडिया स्टार युवक-युवती या लॉन्चिंगसाठी उपस्थित होते.

थाटामाटात गाण्याचा धुमाकूळ

थाटामाटात ह्या गाण्याने अवघ्या पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. ह्या गाण्यामध्ये महाराष्ट्रीयन लग्नपद्धत दाखवली असून त्यात आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन दाखवले आहे. आदित्य सातपुते, हिंदवी पाटील, सानिका भोईटे आणि राहुल रेड्डी या कलाकारांनी या गाण्यात आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे.