राज्यात 17 ऑगस्टपासून सुरु होणार ग्रामीण व शहरी भागातील शाळा; त्याबद्दल मार्गदर्शक सूचना जाहीर

0
422

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शाळा महाविद्यालये बंद होते. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने महत्वाचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय घेतला होता. १७ ऑगस्टपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते दहावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीची शाळा सुरू करणेबाबत या सूचना आहेत.

सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन व अन्य जिल्ह्यांत देखील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतील.

ज्या ठिकाणी शाळा सुरू करणं शक्य आहे, तिथे मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होतील. शहरी भागात करोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना असतील, तर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा. महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी खास समिती गठीत केली जाणार आहे. तसेच, नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत, स्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत होणार आहे.

शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना

  • शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित कराव्यात.
  • शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळा भरवण्यात यावी.
  • एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे.
  • कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
  • हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्ड वॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे.
  • जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रात भरवण्यात याव्यात.
  • प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासापेक्षा अधिक नसावा. प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी सुद्धा नसेल.
  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी शाळेच्या परिसरात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.
  • सोबतच शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग चाचणी घेण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय प्रशासनाकडून केली जावी.
  • विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत्व पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
  • शाळा सुरू करण्यापूर्वी त्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.