आज हिंदी दिवस आहे. भारतामध्ये 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस (Hindi Diwas) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून भारतामध्ये हिंदी भाषेतलं सौंदर्य, त्यामधील साहित्य जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. भारत हा विविधतेमध्ये एकता जपणारा देश आहे. या देशात जशी संस्कृती बदलते तशी भाषादेखील बदलते मात्र उत्तर भारतासह बहुसंख्य राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलाली जाते.
हिंदी भाषा अनमोलहिंदी भाषेला अनमोल महत्त्व आहे. हिंदी दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू हिंदी वाचवण्याचा प्रयत्न आहे. आज आपण इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व देत आहोत. ज्याला इंग्रजी येत नाही त्याला आपण कमी समजतो. साधारणपणे हिंदी बोलणे हे मागास मानले जात असे आणि इंग्रजीत बोलणे आधुनिक आणि अधिक शिक्षित मानले जाते. ही मानसिकता बदलण्यासाठी हिंदी दिन साजरा करण्यात येत आहे.
हिंदी दिवसाचा इतिहास काय आहे
हिंदी दिवस आणि तो हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याचे कारण खूप जुने आहे. १९१८ मध्ये महात्मा गांधींनी त्याला लोकांची सर्वसामान्यांची भाषा म्हटले आणि त्याला देशाची राष्ट्रीय भाषा बनवण्यास सांगितले. 14 सप्टेंबर 1949 रोजी स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी संविधान सभेमध्ये हिंदीला राजभाषा घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला परंतु तो एकमताने तो मंजूर झाला नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढील 2 वर्षात म्हणजेच 14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहलेल्या हिंदी भाषेचा भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचं औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतामध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी तत्कालीन सरकार विशेष प्रयत्न करत होते परंतू देशातील काही राज्यांकडून करण्यात आलेल्या विरोधानंतर हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.
हिंदी भाषेबद्दल काही काही इंटरेस्टिंग गोष्टी
- भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी भाषेचे महत्त्व ओळखून पहिला हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953दिवशी साजरा केला.
- भारतामध्ये हिंदी भाषेला असलेला राजभाषेचा देण्यासाठी इंग्रजी हटवण्याची मागणी करण्यात आली मात्र या पार्श्वभूमीवर देशात आंदोलन सुरू झाली. तामिळनाडूमध्ये जानेवारी 1965 मध्ये भाषावादावरून दंगली देखील पेटल्या होत्या.
- 1918 साली महात्मा गांधी यांनी हिंदी साहित्य संमेलनामध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषा बनवण्याचा मानस बोलून दाखवला होता.
- हिंदी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा अअहे. भारतामध्ये 43.63% लोकं हिंदी बोलतात. आणि देशात हिंदी भाषिकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
- 2021 साली इंटरनेटवर इंग्रजीच्या तुलनेत हिंदीचा वापर करणार्यांची संख्या वाढू शकते. सुमारे 20.1 कोटी लोकं हिंदीचा वापर करू शकतात. गूगलच्या माहितीनुसार, हिंदी भाषेत माहिती वाचणारे प्रतिवर्षी 94% नी वाढत आहेत तर इंग्रजी वाचणार्यांचा दर 17% आहे.
- जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमध्ये टॉप 5 भाषांमध्ये हिंदीचाही समावेश आहे.
हिंदी जगातील सर्वाधिक भाषांपैकी एक
हिंदी भाषा जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. आपली हिंदी केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. हिंदी भाषेत 11 स्वर आणि 35 व्यंजन आहेत आणि ते “देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे. हिंदी ही एकमेव अशी भाषा आहे जी इतर कोणत्याही भाषेपेक्षा समजण्यास सोपी आहे. हिंदी प्रत्येक भारतीयांना माहित असली पाहिजे. कारण त्याने आपल्याला जीवनाचे आदर्श शिकवले आहेत. हिंदी भाषेतूनच इतर अनेक भाषांचा विस्तार झाला आहे.