Bigg Boss Marathi: कोण आहेत बिग बॉसच्या घरातले 15 स्पर्धक?

0
1050

बिग बॉस हिंदी ओटीटीनंतर आता बिग बॉस मराठी सुरू झाले आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटील आल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये मराठी कलाकारांसोबतच किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलची तसचं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कोळी गीतांसाठी ओळखले जाणीरे गायक दादूस म्हणजेच संतोष चौधरीने सहभाग घेतला आहे.

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील नावाजलेल्या चेहऱ्यांसोबतच स्पर्धकांच्या यादीत असेही चेहरे आहेत ज्यांना ‘बिग बॉस’च्या घरात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांपैकीच एक नाव आहे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचं. तृप्ती यांनी स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे.

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील तसंच अभिनेता आणि अरुण गवळींचा जावई अक्षय वाघमारे हेदेखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक दिसतील.

कोण आहेत स्पर्धक?
1. सोनाली पाटील – कोल्हापूरच्या सोनाली पाटीलला टिकटॉकनं ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिनं वैजू नंबर वन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. देवमाणूस या मालिकेत तिने अँडव्होकेट आर्याची भूमिका साकारली होती.

2. विशाल निकम- अभिनेता विशाल निकमची बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एन्ट्री झालीये. साता जन्माच्या गाठी या मालिकेतून विशालला प्रसिद्धी मिळाली होती.

3. स्नेहा वाघ- हिंदी आणि मराठी मालिकेतला प्रसिद्ध चेहरा असलेली स्नेहा वाघ बिग बॉसच्या घरातली स्पर्धक आहे. स्नेहाने अधुरी एक कहाणी, काटा रुते कोणाला या मराठी मालिकांमध्ये काम केलं होतं. तिने ज्योती, वीरा, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्य या हिंदी मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

4. मीरा जगन्नाथ- मीरानं मॉडेलिंगमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिनं माझ्या नवऱ्याचीची बायको या मालिकेत संजनाची भूमिका साकारली होती. येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतील मोमोच्या भूमिकेनं तिला लोकप्रियता मिळवून दिली.

५. तृप्ती देसाई – तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आजवर अनेक धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली
आहेत.

६ . आविष्कार दारव्हेकर- मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आविष्कार दारव्हेकरनं ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली आहे. आविष्कारनं आभाळमाया, या गोजिरवाण्या घरात या मालिकांमध्ये काम केलं आहे.

७. डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे- गायक उत्कर्ष शिंदे हे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांपैकी एक असतील.

८. सुरेखा कुडची – अभिनेत्री आणि नृत्यांगना सुरेखा कुडची यांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. सुरेखा यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत बहुचर्चित ‘मीना आत्या’ ही त्यांची भूमिका गाजली होती.

९. गायत्री दातार- अभिनेत्री गायत्री दातार बिग बॉसच्या घरातली एक स्पर्धक असेल. ‘तुला पाहते रे’ मालिकेतील गायत्रीची भूमिका गाजली होती.

१०. विकास पाटील – ‘बायको अशी हवी’ मालिकेतील अभिनेता विकास पाटील यावेळी बिग बॉसच्या घरात असेल.

११. संतोष चौधरी – आगरी-कोळी गीतांचे गायक संतोष चौधरी यांनाही बिग बॉसच्या घरात स्थान मिळालंय.

१२. मिनल शाह – हिंदी रिअॅलिटी शोमधील नावाजलेल्या मिनल शाह या मराठी बिग बॉसमध्ये असतील.

१३. जय दुधाणे – स्प्लिटव्हिलाफेम जय दुधाने यंदा मराठी बिग बॉसच्या घरात असेल.

१४. अक्षय वाघमारे – मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अक्षय वाघमारे सुद्धा यावेळी बिग बॉसच्या घरात असेल. शिवाय, अक्षय वाघमारे हा गँगस्टर अरुण गवळींचा जावई आहे.

१५. शिवलीला पाटील- कीर्तनकार शिवलीला पाटील या बिग बॉसच्या घरातील एक स्पर्धक असतील. शिवलीला या सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत.