आयएएस अधिकारी म्हणजे काय?

0
911

आयएएस अधिकारी म्हणजे काय? याची सर्वप्रथम माहिती घेऊया 

आयएएस अधिकारी म्हणजे इंडियन एडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी. ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आयएएस अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. त्या पदाच्या वर केवळ मंत्री असतात. भारतात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेंतर्गत केवळ तीन पदांची भरती होते ज्यात IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आयएएस हे आपल्या देशातील एक सर्वोत्तम पद आहे, ज्यासाठी उमेदवार निवडण्यासाठी रात्रंदिवस तयारी करतात. परंतु नागरी परीक्षेत क्रॅक करणे इतके सोपे नाही. केवळ तेच उमेदवार ही परीक्षा क्लिअर करू शकतात, जे खूप परिश्रम व चांगल्या नियोजनासह परीक्षेची तयारी करतात.

नागरी सेवा परीक्षेत (यूपीएससी) टॉप रँकने यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची निवड आयएएस अधिकारी पदासाठी होते. त्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी असते. या परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी असते. दरवर्षी यूपीएससी २४ सेवांसाठी निवड परीक्षा घेते, त्यातील एक आयएएस आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा दंडाधिकारी, एसडीएम इत्यादी वेगवेगळ्या भागात नेमणूक केली जाते. या व्यतिरिक्त, आयएस उमेदवारांना देशातील विविध मंत्रालये आणि जिल्ह्यांचे प्रमुखही केले जाते आणि सर्वोच्च पद म्हणजे कॅबिनेट सचिव.

दरवर्षी साधारण 10 लाख विद्यार्थी फॉर्म भारतात. त्यातले सुमारे 5 लाख विद्यार्थीच प्रत्यक्ष पूर्व परीक्षेला बसतात. यातून त्यावर्षी उपलब्ध असणाऱ्या जागांचा विचार करून त्याच्या 12 ते 15 पट विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी पत्र ठरवले जातात. म्हणजे साधारण 1000 जागा असतील तर 12 ते 15 हजार जणांना मुख्य परीक्षेसाठी बसू दिलं जातं. यात पुन्हा एकूण जागांच्या दुप्पट म्हणजे साधारण 2000 जणं व्यक्तिमत्व चाचणीसाठी निवडली जातात. त्यातून अंतिम 1000 जणांची निवड केली जाते. जर एकूण जागा 1000 धरल्या तर साधारण 100–150 जागा IAS साठी असतात.

आयएएस परीक्षेचा हा शेवटचा टप्पा आहे. यूपीएससी मेन्सची परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांनाच यात बोलावले जातात. याद्वारे उमेदवाराची मानसिक क्षमता तपासली जाते यामुळे वैयक्तिक निर्णय घेण्यात तो किती सक्षम आहे हे दिसून येते. यासह उमेदवाराचे सामान्य ज्ञान देखील तपासले जाते. मुलाखत परीक्षेसाठी २७५ गुण ठेवण्यात आले आहेत. जर उमेदवार देखील या मुलाखत चाचणीत उत्तीर्ण झाले तर त्यांची नियुक्ती आयएएस अधिकारी पदावर केली जाते.

 

कशी कराल IAS ची तयारी?

– यूपीएससी परीक्षा देण्यासाठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे आहे. या परीक्षेची तयारी करायची असेल तर ती या वयापासूनच करावी. कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३२ वर्षं असून उमेदवार जास्तीत जास्त ६ वेळा ही परीक्षा देऊ शकतो.

– दहावीनंतरच या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. यूपीएससीच्या तयारीसाठी अनेक खासगी तसेच शासकीय संस्थाही कार्यरत आहेत.

दररोजचे वर्तमानपत्र आणि नियतकालिक वाचणं अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते.

– दहावीनंतर असा विषय निवडा, ज्यात तुम्हाला रस आहे आणि हाच विषय तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी निवडू शकाल. पसंतीचा विषय आधीच ठरल्याने तुम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

– यूपीएससी परीक्षेत एकूण २५ विषयांमधून आपल्याला विषय निवडायचा असतो. तोच विषय निवडा, जो तुम्हाला अभ्यासायला सोपा जाईल.

 

आयएएससाठी निवड झाल्यावर साधारण 2 वर्षाचे (21महिने )विविध प्रकारचे प्रशिक्षण असते. यानंतर उमेदवारांना मिळालेल्या राज्यात विविध प्रकारच्या पदावर काम करता येते. त्यांच्या नियुक्त्या हा संबंधित राज्य शासनाचा विषय असतो. अनुभवाच्या आधारे या अधिकाऱ्यांचे ज्युनिअर टाइम स्केल, सिनिअर टाइम स्केल, ज्युनिअर ऍडमिस्ट्रेशन स्केल, सिलेक्शन ग्रेड, सुपर टाइम स्केल, above सुपर टाइम स्केल, अपेक्स स्केल, कॅबिनेट सेक्रेटरी स्केल असते. Above सुपर टाइम स्केल मध्ये जाताना गुणवत्ताही महत्वाची ठरते.

या स्केलप्रमाणाने ठरवण्यात आलेल्या पदांची जवाबदारी अधिकाऱ्यावर सोपवण्यात येते. सामान्यपणे ज्युनिअर टाइम मध्ये एखाद्या जिल्ह्यात प्रांत अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, सिनिअर टाइममध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पुढील स्केलमध्ये जिल्हाधिकारी, विविध खात्यांचे सचिव अशी बढती मिळत जाते.

आयएएस अधिकारीचे कार्य काय असतात याबद्दल माहिती घेऊया 

आयएएसचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे देशातील सरकारची धोरणे राबविणे आणि त्यांचे अनुसरण करणे.

सर्व आवश्यक सरकारी बाबी हाताळण्याचे कामही आयएएस अधिकाऱ्यावर सोपविण्यात आले आहे.

संसदेत जे कायदे केले जातात ते संबंधित क्षेत्रातील आयएएस अधिकारी लागू करतात.

आयएएस अधिकारी सरकारने चालवलेल्या विकास कार्यक्रमांची देखरेखही करतात. याशिवाय अनेक विकास कार्यक्रमांच्या निधीची परवानगीही आयएस अधिकाऱ्याने दिली आहे.

आपल्या भागात काम करणारे सर्व सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत नाहीत याची ते खात्री करीत असतात.

आयएएस अधिकारी त्याच्या अंतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचे नियंत्रण ठेवतो.

जर एखादा प्रकल्प विकासासाठी चालू असेल आणि तो योग्यरित्या कार्य करत नसेल तर आयएस अधिकाऱ्यास तो प्रकल्प थांबविण्याची शक्ती आहे.

याव्यतिरिक्त आयएएस ऑफिसरची सरकारच्या विविध विभागांवर, कंपन्यांमध्ये महामंडळांमध्ये प्रमुखपदी नियुक्ती होते. उदाहरणार्थ, एमएमआरडीए, म्हाडा इत्यादी.

आयएएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो :-

आयएएस अधिकारी बनणार्‍या कोणत्याही उमेदवाराला ७ व्या वेतन आयोगानुसार दरमहा २,५०,००० रू. दिले जातात, त्याशिवाय त्यांना प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वैद्यकीय लाभ इत्यादी भत्तादेखील देण्यात येतात, तसेच आयएएस अधिकाऱ्यांना राहण्यासाठी घर, संरक्षण, घरातील नोकर, कार इत्यादी इतर सुविधा देखील दिल्या जातात.

पहिला भारतीय आयएएस अधिकारी कोण होता? 

1854 पूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या गुंतवणूकदारांनी शिफारस केलेल्या व्यक्तींची निवड प्रशासकीय कामासाठी करत असे. गुंतवणूकदारांनी शिफारस केलेल्या व्यक्तींना प्रशिक्षणासाठी हेलीबरी कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं जायचं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना भारतामध्ये नियुक्ती दिली जायची. ब्रिटीश सरकारनं सिव्हील सर्विस कमिशन स्थापन करुन आयएएस निवडण्यास सुरुवात केली. पण त्यामध्ये भारतीयांना प्रवेश मिळू नये म्हणून परीक्षा भारतात न घेता लंडनमध्ये घेण्यात येत होती. तर, वयाची अट 18 ते 23 वर्ष इतकी ठेवण्यात आली. भारतीयांना संधी मिळणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे पहिल्या 10 वर्षात भारतीय व्यक्ती आयएएस होऊ शकला नाही. 

इंग्रज सरकारनं आयएएस परीक्षा भारतात न घेता त्यांच्या देशात घेऊन भारतीयांना त्यामध्ये सहभागी होण्यापासून रोखलं होते. मात्र, 1864 मध्ये सत्येंद्रनाथ टागोर यांनी आयएएस परीक्षेत यश मिळवलं. सत्येंद्रनाथ टागोर आयएएस परीक्षेत यशस्वी होणारे पहिले भारतीय ठरले. सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 मध्ये झाला होता. 1857 ला ते हिंदू कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. सत्येंद्रनाथ टागोर यांची पहिली नेमणूक बॉम्बे प्रांतामध्ये करण्यात आली होती, काही महिन्यामध्येच त्यांची बदली अहमदाबादला करण्यात आली.