भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा, महाराष्ट्रातील या नेत्यांचा समावेश

0
447
  • लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींचा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश

  • महाराष्ट्रातून चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि हिना गावित यांना पहिल्यांदाच संधी 

जेपी नड्डा यांनी आज भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 80 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीतून भाजपविरोधात रणशिंग फुंगकणारे युवा नेते वरुण गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या कार्यकारिणीतून मनेका गांधी यांनाही वगळण्यात आलं आहे. नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल आदींचा समावेश कायम आहे. तर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. यावेळी महत्त्वाचा बदल दिसला तो म्हणजे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या बाबतीत. गेल्या वेळी लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे.

भाजपानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण ८० सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून पहिलं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. पंतप्रधानांनंतर दुसरं नाव पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचं आहे. तर त्यांच्यापाठोपाठ तिसरं नाव मुरली मनोहर जोशी यांचं आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते पक्षाच्या मुख्य प्रवाहात आल्याचं दिसून येत आहे.

राज्यातील इतर भाजपा नेते
चित्रा वाघ, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याव्यतिरिक्त प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे यांचा देखील कार्यकारिणीत सदस्य म्हणून समावेश आहे. त्यासोबत पदाधिकारी म्हणून विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री), सुनील देवधर (राष्ट्रीय मंत्री), पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री), हीना गावित (राष्ट्रीय प्रवक्त्या), जमाल सिद्दिकी (अल्पसंख्य मोर्चा), देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री) यांचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गुरुवारी पक्षाच्या 80 सदस्यीय कार्यकारी समितीची घोषणा केली, ज्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, मुख्तार अब्बास नकवी, डॉ.महेंद्रनाथ पांडे, अमेठीच्या खासदार स्मृती जुबिन इराणी, फतेहपूरच्या खासदार साध्वी निरंजन ज्योती आणि मुझफ्फरनगरचे खासदार डॉ.संजीव यांचा उत्तर प्रदेशमधून एकूण 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे.