आजपासून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यात आली आहेत. चित्रपटगृह, नाट्यगृहांत 50 टक्के प्रेक्षकांची मर्यादा असणार आहे. तसेच कोरोना नियमांचं पालन सक्तीचे करण्यात आले आहेत. प्रेक्षकांना तसेच कलाकारांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. तर दुसरीकडे आजपासून जलतरण तलावही खुले होणार आहेत.
बालगंधर्वमध्ये आज नटराजाचे तसेच रंगमंचाच पूजन झाले. याप्रसंगी कलाकारांनी पारंपरिक गण तसेच गणेशाची प्रार्थना सादर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या रांगेत बसून त्याचा आस्वाद घेतला. यावेळी अजित पवार म्हणाले, परिस्थिती अशीच सुधारत राहिली तर दिवाळीनंतर नाट्यगृहामध्ये 100 टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात येईल.
पुस्तक प्रकाशन, पुरस्कार सोहळे, परिसंवाद, सांगीतिक मैफली, शायरी सादरीकरण अशा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेले एस. एम. जोशी सभागृह आणि श्रमिक पत्रकार भवन येथील कमिन्स सभागृहाच्या तारखा फुल झाल्या आहेत. एस. एम. जोशी सभागृहात २३ ऑक्टोबरपासून कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. नोव्हेंबरमधील शनिवार आणि रविवारच्या दिवसांसाठीही नोंदणी झाली आहे. डिसेंबर महिन्याची पूर्ण नोंदणी झाली आहे. पुढच्या वर्षीच्या तारखांसाठी विचारणा होऊ लागल्याचे राहुल भोसले यांनी सांगितले. कमिन्स सभागृहासाठी नोव्हेंबरमधील तारखा नोंदल्या गेल्या आहेत. डिसेंबरमधील तारखांचे बुकिंग सुरू झाले आहे.
पुण्यात डॉक्टर्स, दोन्ही महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नानं पुणे लसीकरणात आघाडीवर आहे. राज्याच्या तुलनेत बारा टक्के लसीकरण पुण्यानं केलं. तर देशाच्या तुलनेत दहा टक्के लसीकरण महाराष्ट्रानं केलं आहे. राहिलेलं लसीकरण वेगात कसं करता येईल याची चर्चा करण्यात आली आहे. लोक प्रतिनिधींच्या मागणीवरून दिवाळी पहाटला मंजुरी देण्यात आली आहे. मिशन कवच कुंडल या मार्फत लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. पुणे शहरात सीरमच्या सहकार्यानं तर ग्रामीण भागातही लसीकरण केलंय जातंय