कोरोनामुळे पुढे ढकलेले गेलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर नाशिकमध्येच होणार आहे. संमेलनाची मैफील येत्या ३ ते ५ डिसेंबरमध्ये भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखांवरून निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यात चांगलीच पत्रापत्री रंगली होती. विशेष म्हणजे संमेलन पुढे ढकलण्याला ठाले-पाटलांनी सणसणीत पत्र लिहून आक्षेप घेत नाराजी दर्शवली होती. यावरून पालकमंत्री छगन भुजबळ व निमंत्रक जातेगावकर म्हणाले की, ठाले – पाटील नाराज नाहीत. शिवाय मंगलाताई नारळीकरांच्या प्रकृतीबाबत तक्रारी होत्या. तसे जयंत नारळीकरांनी आपल्याला सांगितले होते. त्यामुळे या संमेलनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. आता कोणीही नाराज नाही. सर्व काही व्यवस्थित पार पडेल. ठरल्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 3 ते 5 या तारखे दरम्यान साहित्य संमेलन होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला एखाद्या मोठ्या साहित्यिकाला बोलावले जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होईल. त्याची तयारी झाली आहे. लवकरच उद्घाटक ठरतील. त्यानुसार आपल्याला माहिती देण्यात येईल. या संमलेनाला साऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
संमेलनपूर्व दि. २ डिसेंबर २०२९ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी संमेलनस्थळी होणार आहे. तसेच दि. ४ डिसेंबर २०२९ रोजी नाशिकमधील स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम व दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी संमेलनाचा समारोप झाल्यावर देखील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. संमेलनाचा समारोप दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी होणार असून समस्त साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी रसिकांनी आणि नाशिककरांनी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
असे होणार कार्यक्रम
- भुजबळ नॉलेज हबमध्ये साहित्य संमेलन
- राहण्याची,पार्किंगची आणि इतर व्यवस्था
- गावात संमेसलन केल्यास वाहतूक कोंडी
- रसिकांसाठी बसेस ची व्यबस्था करणार
- नाशिकमधील सर्व विभागातून गाड्या इथे येतील
- 3 तारखेला दिंडी निघणार
- त्यानंतर ध्वज वंदन आणि उद्घाटन
- 4 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम