ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे नक्की काय ?

0
416

आज एक आगळावेगळा विषय तुमच्यासाठी घेऊन आलोय तो म्हणजे ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे नक्की काय आहे ( देवाची करणी). चला तर त्याबद्दल जाणून घेऊया?

ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे नक्की काय ?

खरं तर हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा चित्रपटातून ऐकला असेल नाही का. ऍक्ट ऑफ गॉडचा सोप्या भाषेत अर्थ सांगायचं झाला तर एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेसाठी कोणालाच जबाबदार धरता येत नाही. ती घटना घडून जाणे हे निर्सगामुळे होतं आणि त्याला कोणीच काही करु शकत नाही असं सांगण्यासाठी Act of God चा वापर करतात. Act of God ही टर्म प्रामुख्याने विम्यासंदर्भात वापरली जाते. या कलमास ‘फोर्स मॅजेअर’ (Force Majeure) असेही संबोधले जाते. अ‌ॅक्ट ऑफ गॉड कलम हे बहुतांश कॉर्पोरेट आणि व्यावसायिक कंपन्यांसाठी सुरक्षित पळवाट आहे. यामुळे त्यांना भाडे आणि कर्जाचे देयक तसेच कराराशी संबंधित इतर बंधन/कर्तव्यांमधून सूट मिळते.

फोर्स मॅजेअर’ ही फ्रेंच संज्ञा आहे ज्याचा अर्थ ‘श्रेष्ठ शक्ती’ असा होतो. हे करारासंबंधीचे कलम आहे ज्याअंतर्गत एखाद्या पक्षाला त्याच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कारणांमुळे करारामध्ये दिलेल्या वचनानुसार गोष्टी करण्यापासून मुक्तता मिळते. विशेष म्हणजे, 1872 मधील भारतीय करार अधिनियम या 148 वर्षे जुन्या कायद्यात, जो भारतातील करारांवर नियंत्रण ठेवतो, त्यामध्ये ‘फोर्स मॅजेअर’चा स्पष्ट उल्लेख नाही. परंतु, कलम 32 (आकस्मिक कराराबाबतच्या तरतुदी) आणि कलम 56 मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की, जेव्हा एखादा मोठा अनपेक्षित ‘अ‌ॅक्ट ऑफ गॉड’ प्रसंग घडतो, म्हणजे नैसर्गिक आपत्ती ओढवते, कंपन्या स्वतःची जबाबदारी पार पाडण्याच्या कर्तव्यापासून स्वतःचे रक्षण करु शकतात. सुरुवात करताना अर्थात्, फोर्स मॅजेअर हे दोन्ही पक्षांमधील मूळ कराराचा भाग असणे आवश्यक आहे.

या कलमाचे कार्य कसे चालते?
असमान्य प्रसंगांमध्ये करारासंबंधीची कर्तव्ये पार पाडणे शक्य नाही असे एखाद्या पक्षाला वाटत असेल, तर तो पक्ष करारात नमूद असल्यास ‘अ‌ॅक्ट ऑफ गॉड’ कलम लागू करण्याचे आवाहन करु शकतो. परंतु करारासाठी जबाबदार असलेले वकील हे काय नमूद करण्यात आले आहे आणि काय नाही हे निश्चित करण्यासाठी बहुतेकवेळा करार काळजीपुर्वक तपासतात. जर दुसऱ्या पक्षाला असे वाटले की हा कलम जाहीर करणे योग्य नियमांना धरुन नाही, या गोष्टीस आव्हान देता येते. कारण करारामध्ये अ‌ॅक्ट ऑफ गॉड लागू करण्यापलीकडेही बऱ्याच गोष्टी आहेत.राज्य कायद्यानुसार कराराचा अर्थ लावला जातो. काही कार्यक्षेत्रांमध्ये, व्यवसायांना हे सिद्ध करता आले पाहिजे की त्यांच्या कार्यात आलेले अडथळे हे खरोखर त्यांच्या नियंत्रणाबाहेर होते आणि काय उपाययोजना करावी हे त्यांच्या लक्षात आले नाही. इतर कार्यक्षेत्रांमध्ये, या समस्येचा अंदाज अगोदर लावणे शक्य नव्हते हेही दाखवावे लागते बरं का.

याचवरुन बॉलिवूडमध्येही ओ माय गॉड नावाचा अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळेच बऱ्याच जणांना ऍक्ट ऑफ गॉड म्हणून कलम असतो हे समजले.

उदाहरणार्थ
समजा तुमच्या दुकान किंवा घरचे भूकंप व चक्रीवादळामुळे नुकसान झाले तर तुम्ही ऍक्ट ऑफ गॉड कलमाचा विचार करू शकता. कारण भूकंप आणि चक्रीवादळ ही संकटे मानवनिर्मित नसून नैसर्गिक संकटे आहेत.