Maha Student App: आता ‘महास्टुडंट’ अ‍ॅपद्वारे विद्यार्थी, शिक्षकांची हजेरी डिजिटल

0
286

राज्यामध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती सरल प्रणालीवर भरण्यात येते. यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेण्यात येते. मात्र भारत सरकारने विकसित केलेल्या परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्समध्ये (पीजीआय) शिक्षक व विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने हजेरी भरावी लागते. यासाठी गुणही देण्यात येतात. त्यामुळे ही हजेरी डिजिटलमध्ये सोप्या पद्धतीने नोंदवता यावी, यासाठी राज्य सरकारने ‘MahaStudent’ हे नवे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपमुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी व गैरहजेरी एका क्लिकद्वारे शिक्षकांना कळणे शक्य होणार आहे.

भारत सरकारने पीजीआय हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पद्धतीने उपस्थिती नोंदवण्यासाठी गुण आहेत. त्यामुळे शिक्षकांना दोन्ही ठिकाणी स्वतंत्र नोंदणी करावी लागू नये यासाठी राज्य सरकारने विकसित केलेल्या सरल प्रणालीवर आधारित सुविधा उपलब्ध करून सर्व विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थित डिजिटल पद्धतीने ‘MahaStudent’ अ‍ॅप विकसित केले आहे.

सदर ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या ॲप मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या आधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही क्लिक सरशी नोंदविता येणार आहे. याचसोबत शाळमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नादविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर ॲप मुळे शिक्षकांना विद्याध्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही यासाठी आवश्यक असणारे दोन्ही ॲप चे एकत्रीकरण करण्यात येईल. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर विद्याथ्र्यांची उपस्थिती व शिक्षकांची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे. तरी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.