टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

0
202

 आजचा विषय थोडा वेगळा आहे पण तुमच्या आमच्या कामाचा आहे बरं का. तो विषय म्हणजे टर्म इन्शुरन्स. बऱ्याच वेळा हा विषय आपल्या कानी पडतो खरा पण त्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही असे पाहायला मिळते . तर चला तर मग आपण त्याबद्दल आज माहिती घेऊया.

टर्म चा अर्थ होतो ‘कालावधी’. ठराविक कालावधी करीता घेतलेला जीवन विमा. विमा कालावधी मधे जर तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला विम्याची रक्कम मिळते. हा सर्वात स्वस्त प्रकारचा विमा आहे. यामध्ये सहसा विमा कालावधी संपल्यावर तुम्ही जिवंत राहिलात तर तुम्हाला विम्याची रक्कम मिळत नाही, पण कमी हफ्ता भरून फार मोठा विमा मिळतो.

टर्म इन्शुरन्स हा आयुर्विम्यातील एक प्रमुख विमा प्रकार आहे. आयुर्विम्याची जी मूळ संकल्पना आहे व आयुर्विम्यातून ज्या प्रकारचे विमाकवच अपेक्षित असते ते उद्दिष्ट टर्म इन्शुरन्समधून साध्य होते. कमी रकमेच्या हप्त्याच्या बदल्यात भरघोस विमाकवच हे या विम्याचे वैशिष्ट्य आहे.

हा विमा प्रकार किती स्वस्त असतो ? यासाठी आपण एक उदाहरण पाहूया.

समजा एका व्यक्तीचे वय ३० आहे आणि त्याला ५० लाखाचा विमा हवा आहे. २५ च्या टर्म इन्शुरन्स प्रीमियम calculator नुसार त्या व्यक्तीला १५ हयामध्ये महत्त्वाची भुमिका निभावतो जार एवढा वार्षिक प्रीमियम येतो. व्यक्तीचा विमा कालावधी ३० वर्ष पकडला आहे आणि ही व्यक्ती नॉन स्मोकर आहे, असे गृहीत धरले आहे.

जर का या ३० वर्षांत तुमचा मृत्यू झाला तर तुमच्यावर अवलंबून असलेला परिवार रस्त्यावर येऊ शकतो पण तसे होऊ नये म्हणून टर्म इन्शुरन्स महत्वाची भुमीका निभावतो.

जर तुमचे वय २५ ते ३० वर्ष आहे आणि त्यामध्ये तुमचे वार्षिक उत्पन्न ( आयटीआर मध्ये जे नमूद केले असेल त्याप्रमाणे) पाच ते सहा लाख असेल तर यामध्ये तुम्हाला पंधरा हजार ते पंचवीस हजार हफ्ता येऊ शकतो. पण या हफ्त्यामध्ये तुमच्या परिवारासाठी पंच्याहत्तर लाख ते एक कोटी पर्यंत विमा संरक्षण मिळतो बरं का.

टर्म इन्शुरन्समुळे पैसे वाढत नाहीत. हे गुंतवणुकीचं साधन नाही. त्यातून तुमच्या हयातीत तुम्हाला पैसा मिळत नाही. मात्र तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतात. म्हणून हा इन्श्युरन्स कमावत्या व्यक्तीच्या नावे घेतला जातो.

टर्म इन्शुरन्सचं महत्त्व आपण समजून घेतलं. आता बघू या त्याची वैशिष्ट्यं

टर्म इन्श्युरन्सचा हप्ता तुलनेनं अगदी कमी असतो.

कमी हप्त्यात विमा संरक्षण मात्र तगडं मिळतं. अर्थात मुदतीनंतर तुम्ही जीवंत असाल तर लाभ मात्र मिळत नाही.

ज्याच्या नावावर टर्म इन्श्युरन्स आहे, त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची पूर्ण रक्कम मिळते

काही टर्म प्लानबरोबरच अतिरिक्त फायदे(ज्यांना रायडर बेनिफिट म्हणतात) मिळत असतात. उदा. थोडा जास्त हप्ता भरलात तर आरोग्य विम्याचे काही फायदे मिळू शकतात.

हे इन्श्युरन्स देणाऱ्या कंपनीवर अवलंबून आहे

मुदत पूर्ण होईपर्यंत हप्ता एकच राहतो. तो बदलत नाही.

टर्म इन्शुरन्स कसा निवडावा ?

१. आधी ठरावा कि तुम्हाला किती चा विमा हवा आहे ? हे ठरवताना लक्ष्यात घ्या तुमच्या कुटुंबाचा सध्याचा किती खर्च आहे? तुम्ही नसल्यावर त्यांना किती पैसे लागतील ? तुमच्यावर काही कर्ज आहे का ? साधारणतः तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी १० पट तुमचा विमा असावा.

२. महागाई दर लक्ष्यात घ्या, आज जेवढे पैसे लागतात त्यापेक्षा भविष्यात जास्त लागतील. महागाई दर जवळपास ५-७ % पकडा.

३. आपण साधारणतह ६०-६५ वयापर्यंत काम करतो, म्हणजे आपला टर्म इन्शुरन्स हा त्यावेळेपर्यंत तरी असावा.

4.जितक्या लवकर आपण टर्म इन्शुरन्स प्रारंभ कराल तेवढा प्रीमियम कमी बसेल.