स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिवशीचं का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन?

0
176

12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिन हा भारतातील तरुणांना समर्पित केलेला एक विशेष दिवस आहे, ज्यांच्याकडे देशाचे भविष्य चांगले आणि निरोगी बनवण्याची क्षमता आहे. 12 जानेवारीला भारतीय युवा दिन साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. त्यांची जयंती देश दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करतो. स्वामी विवेकानंदांचा तरुणांशी काय संबंध, त्यांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून का साजरा केला जातो?

असा’ होता स्वामी विवेकानंद यांचा प्रवास
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकत्ता येथे झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. ते वेदांताचे प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. वयाच्या २५ व्या वर्षी विवेकानंदांनी सांसारिक आसक्तीचा त्याग केला आणि ते संन्यासी झाले. १८८१ मध्ये विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जगभरातील लोकांना तत्त्वज्ञानी आणि विचारवंत म्हणून प्रेरणा देण्यास सुरुवात केली.

होते अनेक विषयांचे ज्ञान
विवेकानंदांना धर्म, तत्वज्ञान, इतिहास, कला, सामाजिक शास्त्र, साहित्य यांचे ज्ञान होते. शिक्षणात पारंगत असण्यासोबतच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आणि विचारांचे महत्त्व भारतातील तरुणांमध्ये रुजवणे. स्वामी विवेकानंद हे महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते. देशभरातील सर्व तरुणांसाठी ते प्रेरणास्थान होते. त्यांचे शिक्षण आणि आदर्श भारतीय तरुणांसाठी एक प्रेरणा म्हणून प्रक्षेपित केले जातात.

स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी युवा दिन का साजरा केला जातो?
स्वामी विवेकानंदांना अष्टपैलू म्हणतात. ते धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, कला, समाजशास्त्र, साहित्य यांचे जाणकार होते. शिक्षणात चांगले असण्यासोबतच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते. याशिवाय विवेकानंदजीही चांगले खेळाडू होते. ते तरुणांसाठी प्रेरणास्थानापेक्षा कमी नाही. अनेक प्रसंगी त्यांनी आपल्या अनमोल विचारांनी आणि प्रेरणादायी शब्दांनी तरुणांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. म्हणूनच स्वामी विवेकानंदजी जयंती हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय युवा दिन कधी आणि कसा सुरू झाला
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस तरुणांना समर्पित करण्याची सुरुवात 1984 पासून झाली. त्या दिवसांत भारत सरकारने म्हटले होते की स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान, आदर्श आणि कार्यपद्धती भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. तेव्हापासून स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा करण्यात आली.