भारतीय संघ पराभूत: दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका जिंकली; भारतीय फलंदाजी ढेपाळली

0
127

मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात अखेर भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. पहिली सेंच्युरियन कसोटीजिंकल्यामुळे 29 वर्षानंतर मालिका विजयाचे स्वप्न साकार होईल, अशी आशा निर्माण झाली होती. पण जोहान्सबर्ग पाठोपाठ केपटाऊन कसोटीतही दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून पीटरसनने शानदार 82 धावांची खेळी केली. डुसे-बावुमा जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आज दिवसभरात भारतीय गोलंदाजांना फक्त एक विकेट मिळवता आला.

भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत 13 धावांची आघाडी मिळून दिली होती. पण पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील भारताचा डाव कोसळला. ऋषभ पंतने झळकावलेल्या नाबाद शतकामुळे भारताला 198 धावांपर्यंत मजल मारता आली.

सलामीवीर आणि मधळ्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला धावा करता आल्या नाहीत. यामुळेच कसोटीवर पकड असताना देखील भारताचा पराभव झाला. भारत गेल्या 30 वर्षापासून द.आफ्रिकेत कसोटी क्रिकेट खेळत आहेत. इतक्या वर्षात त्यांना कधीच कसोटी मालिका जिंकता आली नाही. यावेळी भारताला संधी होती. पण सलग दोन सामने गमवल्याने ती गमावली.

केपटाऊनमधील सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला असता, तर दक्षिण अफ्रिकेच्या धरतीवर पहिल्यांदाच कसोटी मालिका देखील जिंकली असती. दक्षिण अफ्रिकेतील भारतीय संघाच्या कसोटी प्रदर्शनाचा विचार केला, तर ते निराशाजनक राहिले आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताने आतापर्यंत खेळलेल्या कसोटी मालिकांपैकी एकही जिंकलेली नाही.