व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय रे भाऊ?

0
327

रशिया आपल्या देशावर व्हॅक्यूम बॉम्बने हल्ला करत असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. आतापर्यंत विकसित केलेल्या अणुबॉम्बव्यतिरिक्त हे सर्वात धोकादायक असल्याचे मानले जाते. ओखतिर्का या शहरावर हा बॉम्ब टाकल्याचा आरोप शहराच्या महापौरांनी केलाय. अणुबॉम्बच्या आधीच्या श्रेणीतला हा बॉम्ब आहे. रशियाच्या या अतिविध्वंसक बॉम्बला फादर ऑफ ऑल बॉम्ब असं म्हटलं जातं.

व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय?
व्हॅक्यूम बॉम्ब हे थर्मोबॅरिक शस्त्र (thermobaric weapon) आहे. थर्मोबॅरिक शस्त्रांमध्ये गनपावडरचा वापर केला जात नाही. त्याऐवजी, व्हॅक्यूम बॉम्ब उच्च-दाबाच्या स्फोटकांनी भरलेले असतात. व्हॅक्यूम बॉम्ब सभोवतालच्या वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेतात आणि शक्तिशाली स्फोट घडवून आणतात. व्हॅक्यूम बॉम्ब इतका भयानक आहे, की तो फुटल्यास 300 मिटर परिसरात प्रचंड हानी होऊ शकते. या बॉम्बमुळे रेडिएशनचा जरी धोका नसला तरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

व्हॅक्यूम बॉम्ब ऑक्सिजन शोषून घेतो

व्हॅक्यूम बॉम्बचे एक महत्त्वाची बाब म्हणजे तो ऑक्सिजन शोषून घेतो आणि मोठा स्फोट करतो. अशा स्फोटांमुळे, अल्ट्रासोनिक शॉकवेव्ह त्यातून बाहेर पडतात आणि अधिक विनाश घडवून आणतात. त्यामुळे जगात अशा शस्त्रांना अधिक भयानक मानलं जातं. त्यामुळे त्याच्या वापरावरती जगात बंदी आहे. हा बॉम्ब रशियाने तयार केला असून तसेच एखाद्या देशाने त्याच्या विरोधात युद्ध करताना विचार करावा यासाठी तो बॉम्ब त्यांनी तयार केला आहे. हा बॉम्ब तयार करण्यात अमेरिकेचा मोठा हात आहे, हा बॉम्ब अमेरिकेने 2003 साली तयार करण्यात आला होता.

या बॉम्बला एयरोसोल बॉम्ब असंही म्हणतात. रशियाने २०१६ मध्ये सीरियावर या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला होता. हा अतिशय धोकादायक बॉम्ब आहे. ४४ टन टीएनटीच्या सामर्थ्याने त्याचा स्फोट होऊ शकतो.