उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजप तर पंजाबमध्ये आपची हवा

0
148

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. भाजपने चार राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर पंजाबच्या जनतेनं अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला कौल दिला आहे. पाच राज्यातील निवडणूक निकालातील कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेता उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली आहे. जवळपास तीन दशकांनंतर राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाला जनतेने पुन्हा कौल दिला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद येणार आहे. केंद्रातील सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. लोकसभेत ८० जागा असल्याने उत्तर प्रदेशात ज्यांची सत्ता स्वाभाविकच दिल्लीचा मार्ग त्यांच्या दृष्टीने प्रशस्त होतो. बहुजन समाज पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली. वीस टक्क्यांवरून थेट तेरा टक्क्यांवर त्यांची मते आली. काँग्रेसला एक-दोन जागा जिंकत कसेबसे अस्तित्व राखता आले.

गोव्यात स्थिर सरकार

४० सदस्य असलेल्या गोवा विधानसभेत पक्षांतरे व अस्थिरतेचा खेळ सुरू असतो. मात्र यंदा भाजपने २० जागा जिंकत बहुमताजवळ जाण्यात यश मिळवले. काँग्रेस मित्रपक्षांसह १२ जागांपर्यंत जाऊ शकले. आता भाजप प्रमोद सावंत यांनाच मुख्यमंत्रीपदी संधी देते की अन्य नवा चेहरा पुढे आणते याची उत्सुकता आहे. भाजपविरोधात मते मोठ्या प्रमाणात फुटली त्याचा फटका काँग्रेसला बसला. काँग्रेसने जर लहान पक्षांना एकत्र करत व्यापक आघाडी तयार केली असती तर चित्र वेगळे दिसले असते. त्यामुळे गोव्यातही सत्तांतराचे काँग्रेसचे स्वप्न अधुरे राहिले. सत्ताविरोधी वातावरण असूनही गोव्यात त्याचा लाभ विरोधकांना मिळाला नाही.

मणिपूरमध्ये भाजपच

ईशान्येकडील राज्ये निधीसाठी केंद्रावर अवलंबून असतात. त्यातच मणिपूरमध्ये भाजपने गेल्या वेळी काँग्रेसपेक्षा कमी जागा निवडून आल्यानंतरही सरकार स्थापन केले होते. मात्र पाच वर्षांत विकासाची केलेली ठळक कामे, केंद्रातील मंत्र्यांचे येथे राज्यात सातत्यपूर्ण दौरे याच्या जोरावर मणिपूर भाजपने सहज जिंकले. येथे काँग्रेसची दारुण अवस्था झाली. काँग्रेसपेक्षा संयुक्त जनता दलाला अधिक जागा मिळाल्या आहेत. एकूणच विधानसभा निवडणुकीत भाजपची सरशी आणि मोदींचा करिश्मा चालला हेच म्हणावे लागेल.

पंजाबमध्ये केजरीवालचे आप

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची लाट होती. दिल्ली प्रारूप पंजाबमध्ये आणण्याच्या आश्वासनाला जनतेने कौल दिला आहे. सत्तारूढ काँग्रेसचा दारुण पराभव करत आप शंभरीजवळ गेला आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ जागा आहेत. त्यात हे यश प्रचंड आहे. पंजाब काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी शिगेला गेली होती. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या उद्देशाने इरेला पेटले होते. मात्र काँग्रेसने दलित समाजातील चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपद दिले. पंजाबमध्ये ३२ टक्के दलित मतदार आहेत. मतदानापूर्वी वर्षभर काँग्रेसने अमरिंदरसिंग यांना बदलले, त्यांनी थेट पक्षच सोडून भाजपशी आघाडी केली. मात्र पंजाबमध्ये भाजपचे विशेष अस्तित्व नाही.

उत्तराखंडमध्ये भाजपाला बहुमत

उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत एकूण 70 जागांपैकी भाजपाने तब्बल 42 जागांवर आघाडी घेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. इथं काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून काँग्रेसला 14 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. उत्तराखंडमध्ये बहुमतामुळे भाजप नेते खूश असून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहेधात आंदोलन झाल्याने भाजपविरोधात रोष होता. त्याचा फटका बसणे अपेक्षित होते. राज्यात भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या. मात्र दारुण स्थिती अकाली दलाची झाली.