SSC Exam : दहावी बोर्ड परीक्षेला उद्यापासून सुरुवात

0
647

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा सुरु झाली आहे तर उद्यापासून म्हणजेच १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती बोर्डाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या शाळांमध्ये उपलब्ध होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी च्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22,911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. उद्या पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे.

बोर्डानं जारी केलेल्या वेळापत्रकाप्रमाणं ही परीक्षा दोन सत्रात आयोजित केली जाईल. पहिल्या शिफ्टमधील परीक्षा 10.30 ते दुपारी 2 पर्यंत होईल. तर, दुसऱ्या सत्रातील परीक्षा दुपारी 3 ते सायंकाळी 5.15 वाजता होईल. दहावीच्या परीक्षा घेताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी 5042 केंद्र निश्चित करण्यात येत होती. मात्र, यावेळी 21 हजार 341 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल फोन, टॅबलेट आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटसचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्तात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.

कोव्हिड 19 विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता ऑफलाइन पद्धतीने आयोजित परीक्षांसाठी काही महत्त्वाचे उपाय योजना करण्यात आलेले आहेत

काय उपाययोजना केल्या आहेत?

  • नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिराने परीक्षांचा आयोजन
  • शाळा स्तरावर परीक्षा केंद्र उपकेंद्र देण्यात आली आहे
  • 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे
  • दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून दिली आहे
  • तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा देण्यात आली आहे