कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाले असल्याने यावेळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी कोरोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने हे सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. रात्री दहाच्या आत होळी करावी तसेच डीजे लावण्यास बंदी घातली आहे. डीजे लावल्यास कायदेशीर बंदी घातली आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास देखील कारवाई केली जाणार आहे.
कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्यानं मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. आता उद्या, 17 तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे
गृहखात्याने जारी केलेले नियम
- रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक.
- होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी.
- दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.
- होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.
- होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.
- कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
- धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत..
दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच करोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.