IPL मध्ये कठोर कोरोना नियम: करोनाविषयक तसेच डीआरएस आणि सुपर ओव्हरसारख्या नियमांचा समावेश

0
421

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15वा सीजन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना मुंबईत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. त्याचवेळी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यावेळी आयपीएलमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडू आणि संघांना कोणतीही सवलत देण्याच्या मनस्थितीत नाही. नियम मोडणाऱ्यांवर एक कोटीचा दंड ठोठावला जाईल. यासोबतच एका सामन्याची बंदी आणि संघाचे गुण वजा केले जातील. बीसीसीआय’ने करोनाविषयक तसेच डीआरएस आणि सुपर ओव्हरसारख्या नियमांचा समावेश केला आहे

नवे करोना नियम

‘बीसीसीआय’ने सर्वात मोठा बदल हा खेळण्यानुरूप वातावरणाशी संबंधित नियमात केला आहे. करोना प्रादुर्भाव वाढल्यास (खेळाडूला करोनाची लागण झाल्यास किंवा लागण झालेला खेळाडू इतरांच्या संपर्कात आल्यास) १२ तंदुरुस्त खेळाडूंचा संघ (सात भारतीय खेळाडूंचा समावेश) उपलब्ध नसेल तर, ‘बीसीसीआय’ सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करेल. तसे शक्य न झाल्यास ’आयपीएल’ची तांत्रिक समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल.

प्रत्येक डावात संघांना दोन ‘डीआरएस’

मेरिलिबोन क्रिकेट क्लबकडून (एमसीसी) सुचविण्यात आलेल्या नियमाला पाठिंबा देत ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’ सामन्यात एकूण चार ‘डीआरएस’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे प्रत्येक डावात दोन्ही संघांना दोन-दोन ‘डीआरएस’चा वापर करता येणार आहे.

बायो-बबल ब्रेक केल्यास सीजनमधून बाहेर पडू शकतात खेळाडू
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, जर कोणताही खेळाडू किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि संघ मालक किंवा बायो बबलशी संबंधित लोकांनी बायो बबलचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जर खेळाडूने बायो-बबल तोडला तर त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल, तसेच त्याला आणखी 7 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. दुसऱ्यांदा, चूक केल्याबद्दल सामन्यावर बंदी देखील घातली जाऊ शकते. तिसर्‍या चुकीवर, खेळाडूला संपूर्ण हंगामासाठी बाहेर केले जाऊ शकते आणि टीमला रिप्लेसमेंटही मिळणार नाही.

संघाच्या चुकीसाठी एक कोटींचा दंड
बायो-बबल ब्रेक करण्यात टीमची चूक असेल तर टीमला एक कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो. तर दुसऱ्या वेळी टीमचा एक पॉइंट आणि तिसऱ्या चुकीवर 3 अंक कट केले जातील.

कुटुंबियांनी कोरोना नियम मोडल्यावर त्यांना बाहेर काढले जाऊ शकते
त्याचवेळी, जर खेळाडूचे कुटुंबीय किंवा सामना अधिकाऱ्यांनी कोरोना प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केले, तर त्यांना 7 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. जर त्यांनी दुस-यांदा चूक केली तर त्यांना बायो बबलमधून काढून टाकले जाईल आणि त्याच वेळी त्यांच्याशी संबंधित खेळाडूला देखील 7 दिवस क्वारंटाईन रहावे लागेल.

झेलनंतर नवीन फलंदाज फलंदाजीला

‘बीसीसीआय’ने मेरिलिबोन क्रिकेट क्लबने झेलसंदर्भात केलेला नियम यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अमलात आणायचे ठरवले आहे. या नवीन नियमानुसार कोणताही फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाज फलंदाजी करील. पण, झेल षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतल्यास मात्र नवा फलंदाज समोरील बाजूला उतरेल.

सुपर ओव्हर ‘टाय’ झाल्यानंतरही विजेता

‘आयपीएल’साठीच्या नवीन सुपर ओव्हर नियमात बदल केल्याने संघाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार जर प्ले-ऑफ किंवा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्येदेखील ‘टाय’ (बरोबरीत) राहिला किंवा अडचणीच्या परिस्थितीत सुपर ओव्हर होऊ शकली नाही तर, साखळी फेरीच्या सामन्यांनुसार गुणतालिकेत वरचढ असलेला संघ विजेता ठरणार आहे.