१० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा

0
381

देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील.

तसेच आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहील आणि त्याला गती दिली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगणयात आलं आहे.या अगोदर केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस दिला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा होती.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासहित काही राज्यांतील कोरोना संदर्भातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यानंतर आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.

एखाद्याला बूस्टर डोस घ्यायचा असेल, तर खासगी हॉस्पिटलमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून, दुसऱ्या डोसला ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे, ते करोनाचा प्रतिबंधात्मक डोस घेऊ शकतात. खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.