डॉ अमोल कोल्हे यांचा ‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
156

अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी ‘राजा शिवछत्रपती’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ते लवकरच ‘विठ्ठल विठ्ठला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

बॉलिवुड चित्रपट चॉक अँड डस्टर , नटसम्राट या चित्रपटाचा गुजराती रिमेक, गुजरात 11 तसेच सुपरहिट चित्रपट हल्की फुलकी इत्यादी चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलाटर यांनी केले आहे रणभूमी या चित्रपटानंतर पुन्हा एकदा डॉ अमोल कोल्हे आणि जयंत गिलाटर एकत्र काम करत आहेत.

जयंत गिलाटर यांच्या मते ‘विठ्ठल विठ्ठला’ हा आजच्या पिढीतील तरूणाई चा विषय आहे. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडून आपली भारतीय संस्कृती आणि मूल्ये विसरत चालली आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.

नुकताच ‘विठ्ठल विठ्ठला’ या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्याचा चेहरा दिसत नाही. जयंत गिलाटर यांच्या मते ‘विठ्ठल विठ्ठला’ हा आजच्या पिढीतील तरूणाईचा विषय आहे. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडून आपली भारतीय संस्कृती आणि मूल्ये विसरत चालली आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विठ्ठल विठ्ठला’ ची निर्मिती संगिता अहिर, बालागिरी वेठगिरी आणि जयंत गिलाटर करणार आहेत, चित्रपटाला डब्बू मलिक संगीत देणार आहे.