स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी: स्कॅम 1992 च्या यशानंतर स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी’ या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

0
185

स्कॅम 1992 हर्षद मेहता स्टोरी’ (Scam 1992 Harshad Mehta) ही सिरीज ओटीटीवर तूफान गाजली. स्कॅम 1992च्या यशानंतर ‘स्कॅम’ फ्रँचायझीच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. एक फळ विक्रेता ते घोटाळ्यांचा मास्टर माइंड असा धक्क करणारा प्रवास असलेला ‘अब्दुल करीम तेलगी’ (Abdul Karim Telgis) यांच्या आयुष्यावर आधारित ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ (Scam 2003 The Telgi Story ) या नव्या सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.

अब्दुल करीम तेलगी यांच्या आयुष्यावर आधारित वेबसीरिज

स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अब्दुल करीम तेलगी यांच्या आयुष्यावर आधारित ‘स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी’ ही वेब सीरिज आहे. एक फळ विक्रेता घोटाळ्यांचा मास्टर माइंड कसा होतो ते प्रेक्षकांना या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. गगन देव रियार या वेब सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारणार आहे.

अब्दुल करीम तेलगीने कर्नाटकमध्ये अनेक घोटाळे केले आहेत. अब्दुल करीम तेलगी हा फळविक्रेता अनेक घोटाळ्यांचा मास्टर माइंड कसा झाला त्याचा प्रवास ‘स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी’ या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. अब्दुल करीम तेलगी याचे नाव स्टॅम्प घोटाळ्यामुळे देशभरात पसरले होते. हंसल मेहता यांनी या वेब सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

2003मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. ही सीरिज पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ या हिंदी पुस्तकातून रूपांतरित करण्यात आला आहे. पत्रकार संजय सिंग यांनीच या घोटाळ्याचा छडा लावला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. सीरिजच्या शुटींगला सुरुवात झाली असून लवकरचं ही सीरिज SonyLIV वर पाहता येणार आहे.