यंदाचा आयपीएल किंग ठरला गुजरात टायटन्स; राजस्थानवर विजय मिळवत पहिल्यांदा पटकावले विजेतेपद

0
136
  • गुजरात टायटन्स ने कमावले २० करोड रुपये
  • जोस बटलर ऑरेंज कॅप आणि युजवेंद्र चहल पर्पल कॅपचा मानकरी

यंदाची आयपीएल 2022 (IPL 2022) गुजरात टायटन्स संघाने दिमाखात जिंकली आहे. अखेरपर्यंत गुणतालिकेत अव्वल राहत गुजरातने विजयश्री मिळवला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने सात गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सची लढत राजस्थान रॉयल्ससोबत झाली. गुजरातने क्वॉलिफायर १ सामन्यात राजस्थानचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर, क्लॉलिफायर २ दोन लढतीमध्ये राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. अंतिम सामन्यात पोहचलेले दोन्ही संघ तुल्यबळ समजले जात होते. मात्र, राजस्थानच्या संघाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणे शक्य झाले नाही.

राजस्थानच्या 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला फारशी चांगली सुरूवात करता आली नाही. सलामीवीर वृद्धीमान साहा आणि मॅथ्यू वेड लवकर बाद झाले. त्यावेळी प्रतिस्पर्धी राजस्थानच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, कर्णधार हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांनी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले. ही जोडी विजेतेपदापर्यंत पोहचेल असे वाटत असताना हार्दिक पंड्या ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरने शुभमनच्या साथीने संघाला आयपीएलचे विजेतपद पटकावले.

आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात गुजरातच्या संघाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता. आपल्या पदापर्णाच्या हंगामात विजेतेपद मिळवून गुजरात टायटन्सने सर्वांची ‘वाहवा’ मिळवली आहे.

कोच आशिष नेहराचाही विक्रम

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहराकडं (Ashish Nehra) गुजरातच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी त्यानं चोखपणे पार पाडली. यामुळं गुजरातच्या विजयासह आशिष नेहराच्याही नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झालीय. आयपीएलचे आतापर्यंत पंधरा हंगाम पार पडले. त्यापैकी 14 हंगामात विजयी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी विदेशी खेळाडूंनी संभाळली. त्यानंतर विजयी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा पहिल्याच भारतीय खेळाडू ठरलाय.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. या सर्व हंगामात श्रीलंकेचा महिला जयवर्धने मुंबईच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. तर, मुख्य प्रशिक्षक म्हणून स्टीफन फ्लेमिंगनं चेन्नईला चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्याचबरोबर टॉम मूडी, रिकी पाँटिंग, जॉन राइट, डॅरेन लेहमन आणि शेन वॉर्न यांनी प्रत्येकी एकदा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. आशिष नेहरानं आता या यादीत प्रवेश केला आहे, जो पहिला भारतीय मुख्य प्रशिक्षक आहे.

हे ठरले आयपीएल २०२२ मधील पुरस्कारांचे मानकरी

विजेता – गुजरात टायटन्सन – 20 कोटी
उप विजेता – राजस्थान रॉयल्स – 12.5 कोटी
ऑरेंज कॅप विजेता – जोस बटलर (836 धावा) – 10 लाख
पर्पल कॅप विजेता – युजवेंद्र चहल (27 विकेट्स) – 10 लाख
सर्वाधिक षटकार – जोस बटलर (45) – 10 लाख
सर्वाधिक चौकार – जोस बटलर (83) – 10 लाख
Most Valuable Player – जोस बटलर – 10 लाख
Emerging Player of the Year – उम्रान मलिक – (22 विकेट्स) – 20 लाख
Game-changer of the season – जोस बटलर ( 1318 गुण) – 10 लाख
Super striker of the season – दिनेश कार्तिक – 10 लाख आणि टाटा पंच गाडी
Power player of the season – जोस बटलर – 10 लाख
Fair play award – राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स
Fastest delivery of the season- ल्युकी फर्ग्युसन – 10 लाख
Catch of the season – एव्हिन लुईस – 10 लाख