पुणे: शिक्षण आणि उद्योग ही क्षेत्रे एकमेकांवर अवलंबून आहेत. दोन्ही क्षेत्रात एकमेकांच्या गरजा ओळखून समन्वय साधायला हवा.नवनवीन कल्पना सत्यात उतरवण्यासाठी नाविन्याचा शोध तरुण मुलांनी घ्यावा. नवीन कल्पना भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.ग्लोबल मार्केटचा विचार करता विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत. असे मत मिनिस्टर ऑफ एज्युकेशनचे चिफ इनोवेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले .
पुण्यातील रायसोनी शिक्षण संस्थेच्या वतीने ‘जी एच आर कनेक्ट2022’ या एक दिवसीय परिषदेत ते बोलत होते.
टाटा मोटर्सचे प्रदीप चॅटर्जी, किर्लोस्कर कंपनीचे मंदार सहस्त्रबुद्धे, तक्षिका इंजिनिअरिंगचे सचिन क्षीरसागर, डायरेक्टर डॉ. आर .डी. खराडकर, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर श्रेयस रायसोनी, ग्लोबल एज्युकेशनचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आदित्य भंडारी ,डीन किरण कोरडे, प्लेसमेंट सेलचे प्रमुख सचिन उमरे आदी उपस्थित होते.
या परिषदेमध्ये आयटी, उत्पादन ,ऑटोमोबाईल पायाभूत सुविधा क्षेत्रातील २०० पेक्षा जास्त उद्योग प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदवला.
कॉलेजचे डायरेक्टर आर् .डी. खराडकर म्हणाले, जी. एच .आर कनेक्ट परिषदचे मुख्य ध्येय उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करणे व तरुणांमध्ये उद्योगांना लागणारी कौशल्य निर्माण करणे हा आहे.
या परिषदेमध्ये इंडस्ट्री 5.0, कृत्रिम बुद्धिमत्ता, हायब्रीड वर्क यावर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. यंदाचे हे दुसरे वर्ष असून औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांचा सहयोग वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या 30 जणांना ‘जीएच. आर. पुरस्कार 2022’ देऊन सन्मानित केले.
ऋता करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. तर उपप्राचार्य वैभव हेंद्रे यांनी आभार मानले.