राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी भारताला बॅडमिंटनमध्ये दोन सुवर्णपदके मिळाली. पीव्ही सिंधूने महिला एकेरीत आणि लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत सुवर्ण यश संपादन केले. लक्ष्यचे मेडल भारतासाठी या मेगा इव्हेंटमधील 20वे सुवर्ण पदक ठरले आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने धडाकेबाज कामगिरी केली आहे. सिंधूने महिला एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.
कॅनाडाची मिशेल ली आणि भारताची पीव्ही सिंधू यांच्यादरम्यान महिला एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात सिंधून मिशेल लीचा २१-१५,२१-१३ अशा फरकाने पराभव केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सिंधूचे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी, २०१४मध्ये ग्लासगो येथे आणि २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक पटकावले होते.
सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेननेदेखील धडाकेबाज खेळू करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. लक्ष्यने पुरुष एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे. मलेशियाचा त्झे योंग एनजी आणि भारताचा लक्ष्य सेन यांच्यादरम्यान पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात लक्ष्यने एनजीचा २१-१९, २१-९, २१-१६ अशा फरकाने पराभव केला. मलेशियाचा खेळाडू जखमी झालेला असूनही त्याने लक्ष्यला कडवी झुंज दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे लक्ष्येचे पहिले सुवर्ण पदक ठरले आहे.