लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले : १९ एप्रिल ते १ जून लोकसभा निवडणूक तर ४ जूनला निकाल

0
437

 

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत चालेल. 4 जूनला निकाल लागणार आहे. मतदानापासून निकालापर्यंत 46 दिवस लागतील. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत देशभरातून तब्बल ९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली.

लोकसभा निवडणूक १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे , चौथ्या टप्प्यासाठी १३ मे, पाचव्या टप्प्यासाठी २० मे, सहाव्या टप्प्यासाठी २५ मे आणि सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?️

  • ️पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर</p>
  • ️दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
  • तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  • ️चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  • पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
  • मतमोजणी – ४ जून                                                                                                                                                                                                                                  आयोगाच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-
    1)97 कोटी मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.1.82 कोटी मतदार हे या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील.
    2)21 ते 31 वयोगटातील मतदारांची संख्या सुमारे 19 कोटी 70 लाख आहे.
    3)85 वर्षांवरील मतदारांची संख्या 82 लाख असून दिव्यांग मतदारांची संख्या सुमारे 88 लाख आहे. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
    4)हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून अरुणाचलच्या जंगलापर्यंत सर्व ठिकाणी मतदान केंद्र तयार आहेत.
    5)85 वर्षांवरील मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतलं जाईल.