जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूला ‘जागतिक साथ’ घोषित केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये वादळ उठले. भारत सरकारने खबरदारीची पाऊले उचलत परदेशातून येणारे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सकाळपासूनच मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २८०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सुद्धा ८०० पेक्षा जास्त अंकांनी घसरण झाली आहे. मार्च २०१८ नंतर पहिल्यांदाच निफ्टी १० हजाराच्या खाली आला आहे. ४० हजारापर्यंत पोहोचलेला सेन्सेक्स ३२ हजार ७७८ हजारापर्यंत घसरला आहे. २००८ च्या जागतिक मंदीनंतर प्रथमच सेन्सेक्स एका सत्रात ३००० अंकांनी कोसळला. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे ११.४२ लाख कोटींचे नुकसान झाले. निफ्टीमध्ये ५०० अंकांची घसरण झाल्यामुळे तो निर्देशांक १०००० च्याही खाली गेला. २६ मार्च २०१८ नंतर पहिल्यांदाच निफ्टी इतक्या खालच्या पातळीवर गेला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्सही बाजार सुरू होताच १८०० अंकांनी कोसळला. सेन्सेक्स ३३९५७ पर्यंत खाली आला.
मागील सात सत्रांमध्ये सेन्सेक्समध्ये १५ टक्के घसरण झाली आहे. करोना आणि त्यासाठी जागतिक पातळीवर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ धोक्यात आली आहे. कोरोना वायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर दिसला. कोरोनाचा विळखा आणि आंतरराष्ट्री बाजारात कच्चा तेलाची घसरण यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट घोंघावले. यामुळे विक्रीचा दबाव वाढला.
डॉलरच्या तुलनेत रुपया मागच्या सत्रात ६१ पैशांनी घसरुन ७४.२५ रुपये प्रति डॉलर वर खुला झाला.रुपयाच्या घसरणीनंतर एका डॉलरसाठी ७४.२५ रुपये मोजावे लागणार आहेत.