जर्मन फूटवेअर कंपनी वॉन वेल्क्स भारतात सुरु करणार प्रकल्प

0
500

चीनच्या एका शहरातून उत्पन्न झालेल्या आणि आता जगभर फैलावलेल्या करोना विषाणूचे परिणाम आता चीनी उद्योग क्षेत्रावर दिसू लागले असून, अनेक परदेशी कंपन्या चीन मधून त्यांचा गाशा गुंडाळू लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मूळ भारतीय असलेल्या लावा या कंपनीनं चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंकर आता जर्मनीची बूट तयार करणारी कंपनी वॉन वेल्सनं आपला चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच लवकरच ही कंपनी भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहे.

वॉन वेल्स ही कंपनी जगभरात आपल्या फुटवेअर्ससाठी ओळखली जाते, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांकडून देण्यात आली. उत्पादनांचा वापर केल्यानं पाय, गुडघे आणि कंबरेच्या दुखण्यातून आराम मिळतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. वॉन वेल्सनं दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या उत्पादनांची विक्री ८० देशांमध्ये होते. तर १० लाखांपेक्षा अधिक लोक त्यांच्या उत्पादनांचा वापर करतात असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आगे. तसंच या कंपनीची ५०० पेक्षा अधिक रिटेल स्टोअर्स असून ऑनलाइन पोर्टलवरदेखील या उत्पादनांची विक्री करण्यात येत असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

जर्मनीची प्रख्यात फूटवेअर कंपनी वॉन वेल्क्सने देखील चीनमधले उत्पादन युनिट बंद करून भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यदायी फूटवेअर बनविण्यात ही कंपनी अग्रगण्य मानली जाते. या पाठदुखी, गुडघे – घोटेदुखी टाळण्यासाठी ही कंपनी स्पेशल फूटवेअर बनविते. आग्रा येथील फूटवेअर कंपनी आयट्रीक प्रा. लि. यांच्या बरोबर करार झाला असून लवकरच उत्पादन सुरू होईल, अशी माहिती आयट्रीक कंपनीचे सीईओ आशिष जैन यांनी दिली.

उत्तर प्रदेशात वॉन वेल्क्स कंपनीचे आम्ही स्वागत करतो. कंपनीचे मालक सासा एव्हज् गभ्म यांनी राज्यात मोठी गुंतवणूक केल्याने १० हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार तयार होतील, असे राज्याचे लघु उद्योगमंत्री उदय भान यांनी सांगितले.