शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने एका रेव्ह पार्टीतून अटक केलीये. आर्यनवर डृग्जचं सेवन, खरेदी आणि ते बाळगण्याचा आरोप आहे. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका क्रूझवर रेव्ह पार्टी सुरू होती. यावर छापा टाकत एनसीबीने ही मोठी कारवाई केली. त्याचमुळे सध्या रेव्ह पार्टीहा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे आपण आज पण रेव्ह पार्टी म्हणजे नक्की काय? रेव्ह पार्टीत काय होतं? याबद्दल माहिती घेणार आहोत.
रेव्ह पार्टी म्हणजे काय?
रेव्ह पार्टीत खासकरून म्युझिक, डान्स आणि अंमली पदार्थांचा वापर केला जातो. तसंच काही पार्ट्यांमध्ये सेक्सही चालतो. ड्रग्जचं सेवन, म्युझिक, डान्स मस्ती आणि सेक्स या सगळ्यांचा एकत्रिक कॉम्बो म्हणजे रेव्ह पार्टी. या रेव्ह पार्ट्या पूर्वी खुल्या जागेत पण सहसा कुणाचं लक्ष जाणार नाही अशा चालायच्या. त्याच्यावर पोलिसांचे छापे पडू लागल्याने आता या पार्ट्या बंदीस्त जागेत होतात.
हायप्रोफाईल मॉडेल्स, फॅशन क्षेत्रातले लोक, सेलिब्रिटी असे लोक या पार्ट्यांना हजेरी लावत असतात. मात्र ही पार्टी कधी कुठे कशी होणार आहे याची माहिती फक्त ठराविक लोकांनाच असते. आपल्या सर्कलच्या बाहेर ही माहिती कुणीही जाऊ देत नाही. याचं महत्त्वाचं कारण असतं या पार्ट्यांमध्ये होणारा अंमली पदार्थांचा वापर आणि सेक्स. या दोन गोष्टी धाड टाकण्याला, तुरुंगात जायला पुरेशा ठरू शकतात. त्यामुळे अशा पार्टीजची खबर कुणालाही कानोकान नसते. या पार्टीज गुप्त स्वरूपात ठरवल्या जातात आणि पार पडल्या जातात. श्रीमंत आणि सेलिब्रिटी कुटुंबांतील अनेक चेहरे या पार्टीमध्ये दिसतात. मद्य आणि ड्रग्जच्या नशेत असणाऱे अनेकजण या पार्टीत बेधुंद अवस्थेत असतात. ड्रग्ज विक्री करणाऱ्यांसाठी ही पार्टी पैसे कमवण्याची मोठी संधी असते.
कोणकोणत्या ड्रग्जचा वापर या पार्टीदरम्यान केला जातो?
रेव्ह पार्टीमध्ये प्रत्येकजण सहभागी होऊ शकत नाही. यासाठी मोठी रक्कमही मोजावी लागते. या पार्टीमध्ये मारिजुआना, गांजा, चरस, कोकेन, हशीश, एलएसडी, मेफेड्रोन यांसारखे ड्रग्ज वापरात आणले जातात. यापैकी काही ड्रग्जचा परिणाम ७ ते ८ तासांपर्यंत राहतो. पार्टीच्या आयोजकांकडूनच ड्रग्ज उपलब्ध करुन देण्यात येतात. फक्त मुलंच नव्हे, तर मुलींचाही या पार्टीमध्ये सहभाग असतो.
Rave हा शब्द कुठून आला?
Rave हा शब्द एका जमैकन शब्दावर बेतलेला आहे. 80 च्या दशकात या पार्टीज काही प्रमाणात सुरू झाल्या होत्या. मात्र भारतात त्याचं पेव उशिरा फुटलं. रात्रभर पार्टी करणं, म्युझिक ऐकणं यात बेकायदेशीर असं काहीच नाही. यातला पुढचा भाग म्हणजेच अंमली पदार्थांचा वापर आणि सेक्स या दोन गोष्टी मात्र बेकायदेशीर ठरतात. त्यामुळेच अशा पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असते आणि त्या पार्ट्यांची माहिती मिळाली तर त्यांच्यावर धाड टाकली जाते आणि अटकेची कारवाई होते.