हंगाम परीक्षेचा: दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरु

0
311

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्यापासून (3 मार्च) सुरु होत आहे.उद्यापासून सुरू होणारी ही परीक्षा २३ मार्च रोजी संपणार आहे.
यंदा राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थींची वाढ आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके ‘गैरमार्गाशी लढा’ या नावाने काम करणार आहेत. यात महिलांचे एक विशेष पथक आहे. प्रत्येक विभागीय मंडळात हेल्पलाईन तयार करण्यात आल्या असून या हेल्पलाइनवरून विद्यार्थ्यांना, पालकांना येणाऱ्या अडचणींवर २४ तास मार्गदर्शन करण्यात येईल.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीत होणार आहे.

परीक्षा काळामध्ये जास्त ताण न घेता बिनधास्त मोकळेप्रमाणे पेपर लिहा आणि आनंदी राहा. परीक्षा कालावधीमध्ये चांगला अभ्यास करून शांततेने पेपर सोडविण्याचा प्रयत्न करा.

दहावीच्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना परीक्षेसाठी शुभेच्छा

ALL IS WELL