दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने; यंदा स्वतंत्र केंद्र नाही, शाळेतच परीक्षा

0
254

राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारवीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे. त्यामुळे यंदा परीक्षा कशापद्धतीने होणार? याबद्दल पालकांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करत दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय व अन्य महत्वाच्या सूचनांची माहिती आज (शनिवार) पत्रकारपरिषदेत दिली. त्यानुसार इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची त्यांनी जाहीर केलं. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.

ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत खूप विचार केला गेला पण दुर्गम भागात ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं. 80 मार्कच्या पेपरसाठी साडे तीन तास वेळ मिळणार आहे, म्हणजे पेपर सकाळी साडे 10 वाजता सुरू होणार असून ती दुपारी 2 वाजेपर्यत असेल. 40 आणि 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढ मिळणार आहे. दिव्यांगांसाठी सगळ्या पेपरना अतिरिक्त एक तासाची वाढीव वेळ देण्यात येणार आहे. तर प्रॅक्टिकलच्या परीक्षा गृहपाठ पद्धतीने होणार आहेत. राज्यात दहावीसाठी सुमारे 17 लाख विद्यार्थी तर बारावीसाठी सुमारे 13 लाख विद्यार्थी बसले आहेत.

पेपरचा वेळ 30 मिनिटांनी वाढवला
दहावी आणि बारावीच्या 80 गुणांच्या पेपरसाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यानं 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 आणि 50 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना एकूण 1 तासासाठी 20 मिनिटांप्रमाणं वेळ वाढवून देण्यात येईल.

विशेष परीक्षा
परीक्षा सुरु असताना एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणं जाणवली किंवा कोरोना संसर्ग झाला असेल. कोरोना झाल्यानं करण्यात आलेल्या लॉकडाऊ, कंन्टेनमेंट झोन, संचारबंदीमुळे परीक्षा देऊ न शकलेलेया विद्यार्थ्यांसाठीव विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यात घेण्यात येईल.

प्रात्याक्षिक परीक्षा
10 वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक परीक्षाऐंवजी कोरोनामुळे विशिष्ट लेखन कार्य म्हणजे असाईनमेंट द्यावे लागतील. असाईनमेंट सादर करण्यासाठी 21 मे 10 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर 12 वी साठी प्रात्याक्षिक परीक्षा 22 मे ते 10 जून दरम्यान होईल. 12 वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर 15 दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावी लागणार आहेत.

दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषय परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासा 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल असं बोर्डाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.

दहावी बारावी परीक्षांचं आयोजन करणाऱ्या शाळा महाविद्यालयांना कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करण्यासंदर्भात राज्य सरकार मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे.