शाळा पुन्हा गजबजणार! एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार

0
413

राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी हिरवा कंदिल दिला. पालकांच्या संमतीने राज्यात खासगी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आता महापालिका आणि सर्व सरकारी शाळा देखील सुरू होणार आहेत.

शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होईल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाने पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. राज्यातील काही ठिकाणी याआधीपासूनच चौथीपासून, सातवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागात चौथीपर्यंत, शहरी भागांत सातवीपर्यंत

उल्लेखनीय बाब म्हणजे, स्थानिक पातळीवर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालेली असताना त्या-त्या ठिकाणी चौथीपासून पुढील वर्गांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. काही खासगी इंग्रजी शाळा पालकांच्या मंजुरीने पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत आहेत. तर काही शाळांनी ऑनलाइनच्या माध्यमातून वर्ग घेतले. आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागात पहिली ते चौथी पर्यंत आणि शहरी भागांत पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत. त्या-त्या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय लागू केला असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

शाळा सुरु करण्याबाबत सरकारची नियमावली काय?
>> शक्य असल्यास प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनीक सुरु करावं

>> विद्यार्थ्यांचं तापमान नियमीतपणे तपासावं

>> शक्य असल्यास त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी

>> सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात

>> हेल्थ क्लिनीकसाठी स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांची मदत घ्यावी

>> यासाठी लागणारा निधी CSR फंडातून खर्च करावा

विद्यार्थी आणि पालकांसाठी सरकारच्या सूचना
मुलांना शाळेत चालत येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं
ज्या शाळांमध्ये खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात त्या वाहनात एका सीटवर एक विद्यार्थी प्रवास करेल याची काळजी घ्यावी
विद्यार्थी बसमध्ये चढताना आणि उतरताना चालक आणि वाहकांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावं