राज्यात ‘या’ तारखेपासून कॉलेज सुरु होणार; जाणून घ्या काय असेल नियमावली

0
245

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू झाल्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. करोनामुळे दीर्घकाळापासून बंद असलेली महाविद्यालये अखेर लवकरच सुरू होत आहेत. मात्र यासाठी विद्यार्थी तसंच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काही नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी काही नियमावली तयार करण्यात आली आहे.

येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरु होणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात तिथल्या परिस्थितीनुसार वेगवेगळी नियमावली असणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवा असे निर्देशही देण्यात आले आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना हजर राहता येणार नाही त्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी, विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असतील, कोरोनाचा प्रदूर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील, डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील नियमावली

  • कॉलेज सुरु करताना कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.
  • 50% पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू केले जाणार आहेत.
  • लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
  • ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण होऊ शकलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  • ज्या विद्यार्थ्याना कॉलजेमध्ये येणं शक्य होत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी.
  • कोरोनाची नियमावली पाळून वसतिगृह सुरु करण्यात येतील.
  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं संपूर्ण लसीकरण होणं महत्त्वाचं आहे.
  • राज्यातील सर्व महाविद्यालयांनी कोरोनचे सर्व नियम पाळूनच महाविद्यालयं सुरु करायची आहेत.