परीक्षा होणारच; अंतिम वर्षाच्या परीक्षा घराबाहेर न पडताच होणार

0
273
  • विद्यार्थींनी घरातूनच परीक्षा द्यावी याबाबत कुलगुरूंचे एकमत
  • परीक्षा शक्यतो ऑनलाइन घेण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम परीक्षा घेतल्याखेरीज पदवी देऊ नये, असा निर्णय दिल्यामुळे राज्य सरकारला परीक्षेसंदर्भात निर्णय करणं भाग पडलं. आता अंतिम परीक्षेसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली. ‘विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत न बोलवण्यावर राज्य सरकार ठाम आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. परीक्षा शक्यतो ऑनलाईन घेण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांवर दबाव येऊ नये यासाठी कमी गुणांची परीक्षा असेल असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं स्पष्ट केलं आहे. तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “युजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. युजीसीने ही मागणी मान्य करावी यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा आणि तशी विनंती यूजीसीकडे करावी अशी सूचना कऱण्यात आली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ‘काही विद्यापीठे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल लावतील. विद्यार्थींना घराबाहेर पडून परीक्षा द्यावी लागणार नाही. परीक्षा कशा पद्धतीने, कोणत्या सोप्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत समिती परवा आपला प्रस्ताव सादर करणार आहे. विद्यार्थींनी घरातूनच परीक्षा द्यावी याबाबत कुलगुरूंचे एकमत झालं आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.’

कशी असेल परीक्षा? 

  • कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालच्या समितीने परीक्षेसंदर्भात सूचना शासनाला कळवल्या
  • एकूण 7,92,385 विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठांना घ्यायची आहे.
  • पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात येईल.
  • परीक्षा कमी मार्कांची असेल, म्हणजे विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही
  • विध्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत यावर आम्ही ठाम
  • ऑनलाईन परिक्षे मध्येही अनेक प्रकार आहेत. MCQ, OMR किंवा असाईनमेंट पद्धतीमधून परीक्षा घेता येईल याचा विचार होईल.
  • ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात परीक्षेचा निर्णय होऊ शकतो.
  • मुंबई युनिव्हर्सिटीने 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढीची UGC कडे मागणी करावी अशी विनंती केली आहे.
  • दोन दिवसात आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक लावून UGCकडे मागणी करणार आहोत.
  • विध्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घेऊ
  • काही कुलगुरूंनी सूचनांसाठी अजून एक दिवस मागितला आहे
  • परीक्षा आणि निकालाची तारीख, एटीकेटीचं काय यासंदर्भात निर्णय घेऊ.
  • विध्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचे एकमत झाले आहे