Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

0
270

दहावीचा निकाल ( SSC Result 2021)उद्या जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्यानं रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरवण्यात आलं होतं.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या साहाय्याने करण्यात आलं आहे. १०० गुणांच्या मूल्यमापनामध्ये ५० गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या साहाय्याने दिले जातील. तर उरलेले ५० गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असतील. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील तर करोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षण आणि वेबिनारचं आयोजन १० जून रोजी करण्यात आलं होतं. त्यानंतर २३ जून ते ०२ जुलै या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी आपल्या संगणक प्रणालीमध्ये हे गुण नोंदवले. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

दहावीचा निकाल कुठे पाहणार?
  • www.mahresult.nic.in
  • www.sscresult.mkcl.org
  • www.maharashtraeduction.com