स्कुल चले हम; आजपासून ठराविक राज्यांत शाळा ‘अनलॉक

0
289

देशात कोरोना महामारीच्या दुष्टचक्रामध्ये सुमारे सहा महिन्यांनंतर सोमवारपासून काही राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरू होतील. मात्र, कोरोनाचा फैलाव जास्त असणाऱ्या राज्यांमध्ये शाळा तूर्तास बंद असणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शाळा नेमक्या कधी सुरू होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. २१ सप्टेंबर म्हणजेच आज पासून काही ठराविक राज्यांत इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा आणि महाविद्यालय सुरू केले जाणार आहेत.

बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड या राज्यांत आजपासून 50 टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तर उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे शाळा अद्याप सुरू करण्यात येणार नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता शाळा सुरू करता येणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एका वेळी शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावले जाऊ शकते. ज्या शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी लावण्याची पद्धत आहे, तेथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी इतरही काही व्यवस्था असणे आवश्यक आहे. जर शाळा विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करीत असेल तर दररोज नियमितपणे वाहनाची स्वच्छता करावी लागेल.

विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग प्रवेशव्दारावरच
कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझर अशा उपायांचा अनिवार्य वापर करावा लागणार आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंगही केली जाणार आहे. खुल्या जागेत वर्ग भरणार नाहीत, सोबतच मुलांची बसण्याच्या व्यवस्थेत एकमेकांपासून कमीत कमी ६ फुटांचे अंतर असणे गरजेचे आहे.

शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार, फक्त कन्टेन्मेट झोनमध्ये न येणाऱ्या शाळा आणि कॉलेज सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच कन्टेन्मेट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेत येण्याची परवानी नाही. तसेच वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला तसेच आजारी असलेल्या शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात येण्याची परवानगी नाही.

शाळा बंद असलेली राज्ये
उत्तर प्रदेश , दिल्ली , गुजरात , मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड , छत्तीसगड, राजस्थान, केरळ आणि कर्नाटक.

शाळा सुरू होणार असलेली राज्ये
हरियाणा, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, चंदीगड, नागालँड, मेघालय आणि आंध्र प्रदेश.

हे असतील नियम

  • एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर पाळणे गरजेचे
  •  फेस कव्हर किंवा मास्कचा वापर अनिवार्य
  •  हात कमीत कमी ४०-६० सेकंद धुणे गरजेचे
  • अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा वापर गरजेचा
  •  खोकताना, शिंकताना नाका-तोंडाला रुमाल गरजेचा
  • आजारी वाटल्यास लगेचच संबंधित अधिका-यांना सूचित करा
  • शाळा परिसरात थुंकण्यार बंदी
  •  शक्य असेल तिथे आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करावा