‘या’ तारखेपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

0
543

कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील शाळा या बंद राहणार आहेत. या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.

मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते” असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, स्थानिक परिस्थितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. अर्थात यासाठी पालकांची संमती, शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आदी सर्व यापूर्वीचे नियम यापुढेही लागू राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे