कोण आहे ही मरीना कुंवर?

0
417

(जिचं नाव घेत सोनू निगमने भूषण कुमार ला दिली एक्सपोज करण्याची धमकी)

बॉलिवूडमध्ये सध्या घराणेशाहीवरून अनेक वाद रंगले आहेत. या वादात एकामागोमाग एक नवीन नावं पुढे येत आहेत. काहीजण घराणेशाहीबद्दल बोलत अनेक गोष्टी सर्वांसमोर ठेवत आहेत तर काहीजण सोशल मीडियाला नकारात्मक म्हणत त्यापासून दूर जात आहेत. या सगळ्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमने एक वेगळाच विषय समोर आणला आहे. टी-सीरिजचा मालक भूषण कुमारवर त्याने अनेक गंभीर आरोप केले आहेत.

‘माझ्याशी पंगा घेतला तर मरीना कुंवरचा तो व्हिडीओ आपल्या YouTube वर टाकेन’, अशी धमकी सोनू निगमने भूषण कुमारला व्हिडीओतून दिली आहे. ही मरीना कुंवर नेमकी आहे कोण आणि तिचा भूषण कुमारशी काय संबंध आहे? तिचा कोणता व्हिडीओ टाकून भूषण कुमारला एक्सपोझ करण्याची धमकी सोनू निगम देत आहे? तर ही आहे ती मरीना कुंवर जी एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे.सध्या सोशल मीडियापासून गूगलवर सगळीकडे मरिनाचं नाव सर्च करण्यात येत आहे.

कोण आहे ही मरीना कुंवर?

मरीना हे एक टीव्ही अभिनेत्री आहे जिने टीव्हीच्या बर्‍याच मालिकेमध्ये भाग घेतला आहे. यात जिंदगी तुमसे, जग्गु दादा, सीआयडी आणि आहट यासारख्या नावांचा समावेश आहे. 2017 मध्ये मरीना अक्षय कुमार सोबत ‘मिलियन डॉलर बेबी’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार होती. 2018 मध्ये मरीना कुंवरने न‍िर्देशक साजिद खान आणि भूषण कुमारवर शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी मरीना कुंवरने #MeToo अभियाना अंतर्गातील एका मुलाखतील भूषण कुमारसंदर्भात मोठा खुलासा केला होता. भूषण कुंवरने मला व्हिडिओमध्ये काम देण्याची ऑफर देत घरी बोलावलं होतं आणि माझ्याबरोबर चुकीचं वर्तन केलं होतं, असंही मरीनाने या मुलाखतीत सांगितलं होतं.

२०१७ मध्ये डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमबद्दल तिने अनेक खुलासे केले होते. मरिनाने सांगितलं होतं की जेव्हा ती राम रहिमकडे गेली होती तेव्हा त्याने मरिनाला मिठी मारली होती. यासोबतच तो मरिनाला अयोग्य पद्धतीने स्पर्श करायचा. एवढंच नाही तर राम रहिम तिला घेऊन बेडरूममध्ये गेला होता. तिला पैशांची किंवा इतर कोणत्याही गोष्टींची चिंता करण्याची गरज नसल्याचं त्याने सांगितलं. ऑगस्ट २०१७ मध्ये राम रहिमला दोन महिलांच्या बलात्कारप्रकरणी २० वर्षांसाठी तुरुंगात ठेवण्यात आले. जेव्हा राम रहिमला तुरुंगात पाठवण्यात आले तेव्हा मरिनाने त्याने दिलेल्या त्रासाबद्दल सांगण्यास सुरुवात केली.

दरम्यान, 2016 मध्ये मरीना आणि टीव्ही अभिनेता मयूर वर्मा यांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर बिग बॉस 9 मध्ये या दोघांना संपर्क साधण्यात आला होता. सोनू निगम यांच्या भूषण कुमार संदर्भातील खुलाशानंतर सध्या सोशल मीडियावर मरीना कुंवरचं नाव ट्रेडिंग होतं आहे.