कोरोना व्हायरसचा फटका; आयफा पुरस्कार सोहळ्याच्या तारखेत बदल

0
460

संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने त्रस्त झालेला आहे. हळू हळू आता भारतातही कोरोना व्हायरसने शिरकाव केलेला असून सर्वत्र भीतीचे वातवरण आहे. या कोरोना व्हायरसचा फटका मध्यप्रदेश येथे होणाऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स म्हणजेच आयफा पुरस्कार २०२०ला ही बसला आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण पाहता मध्य प्रदेशात होणारा आयफा पुरस्कार 2020 पुढे ढकलण्यात आला आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस 27 ते 29 मार्च दरम्यान मध्यप्रदेशमध्ये इंदूर येथे होणार होता. IIFA 2020च्या निमित्ताने जगभरातून कलाविश्वातील काही प्रसिद्ध मंडळीं या सोहळ्यासाठी येणं अपेक्षित होतं. पण कोरोना व्हायरस कहर बघता आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून आयफा मॅनेजमेंट आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी मध्य प्रदेश सरकारशी चर्चा केल्यानंतर हा सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात नामांकन, होस्ट व परफॉमर्सची यादीही जाहीर करण्यात आली. त्या अनुषंगाने सलमान खान, रितेश देशमुख, मनीष पॉल आणि सुनील ग्रोव्हर एकत्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार होते तर शाहरुख खान, कार्तिक आर्यन, हृतिक रोशन, करीना कपूर, जॅकलिन फर्नांडिज आणि कतरिना कैफ येथे सादरीकरण करणार आहेत. या सोहळ्यात एकूण 11 प्रकारात श्रेणीत पुरस्कर दिले जाणार आहेत.

मध्य प्रदेशात होणार्‍या या पुरस्कारांच्या नवीन तारखा व योजना लवकरच जाहीर केल्या जातील. आयफाच्या जादूचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून आलेल्या सर्व चाहत्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आयफा पूर्णपणे वचनबद्ध आहे. आपल्‍याला होणार्‍या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आशा करतो की सर्व संबंधित लोक परिस्थितीची संवेदनशीलता समजून घेतील.” असे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.