सुरमाँ भोपाली’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं निधन

0
654

प्रसिद्ध विनोदी अभिनेते जगदीप म्हणजेच सय्यद इश्तियाक अहमद जाफरी (81) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला. त्यांनी बी. आर. चोप्रा यांच्या ‘अफसाना’ या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरू केली. जगदीप यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला होता. त्यांची शोले या चित्रपटातील सुरमाँ भोपाली साकारलेली ही भूमिका फार गाजली होती. उत्तम अभिनय शैली आणि विनोदीबुद्धी यांच्या जोरावर त्यांनी कलाविश्वात एक भक्कम स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

बाल कलाकार म्हणून त्यांनी अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना, आर-पार, लैला मजनू, दो बीघा जमीन आणि एक पंछी एक डाल यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं. यानंतर भाभी, बरखा, बिंदिया या सिनेमांमध्ये जगदीप मुख्य अभिनेता म्हणून झळकले. परंतु विनोदी कलाकार म्हणून त्यांना जास्त पसंती मिळाली. 1975 मधला सुपरहिट चित्रपट ‘शोले’मधील ‘सूरमा भोपाली’ हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

जगदीप यांनी ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातून विनोदी कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांचा अखेरचा चित्रपट ‘गली गली चोर है’ हा होता, जो 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. तसंच त्यांनी ‘सूरमा भोपाली’ नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं.

जगदीप यांनी तीन बहूरानियां, खिलौना, फुद्ददू, सास भी कभी बहू थी, गोरा और काला, बिदाई, आईना, एजेंट विनोद, युवराज, सुरक्षा, एक बार कहो, फिर वही रात, मोर्चा, कुर्बानी, पुराना मंदिर, शहंशाह, फूल और कांटे, अंदाज अपना अपना, चायना गेट यांसारख्या सुमारे 400 सिनेमात अभिनय करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर त्यांची मुलं जावेद जाफरी आणि नावेद जाफरी तसंच नातून मिजान जाफरीने अभिनयाच्या विश्वात पदार्पण केलं.

जयदीप यांचे काही प्रसिद्ध डायलॉग:-

  1. हमारा नाम सूरमा भोपाली ऐसे ही नहीं है. ( शोले)
  2. तुम लोग इतना सा थे, तालाब में नंगे नहाते थे… हम पकड़कर बाहर निकालते थे… अब तो तुम पूरे जेम्स बॉण्ड हो गए… सांड के सांड हो गए (क्रोध)
  3. हम लड़ता नहीं, लड़वाता है… हम करता नहीं, करवाता है… हम मारता नहीं, मरवाता है (विधाता)
  4. नारी ज्ञान महा ज्ञान है… इसके बिना सारे ज्ञान अधूरे रह जाते हैं… इसलिए हर मर्द को चाहिए कि इस ज्ञान का पूरा-पूरा अध्ययन करे. (एक नारी एक ब्रह्मचारी)
  5. मेहनत से मिले दौलत तो अल्लाह की रहमत है… मिले हराम की तो शैतान की लानत है… पीठ पर मारकर अपनों के खंजर जो मिले दौलत… अरे वो लानत है, वो लानत है, वो लानत है. (पुलिसवाला गुंडा)
  6. टंकी में नहीं तेल… तो बड़े से बड़ा इंजीनियर फेल. (जाल)

जावेदचा ट्वीट व्हिडिओ व्हायरल होत आहे

जगदीप यांच्या मृत्यूनंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत त्यांनी आपला सूरमा भोपालीचा डायलॉग म्हटला आहे. हा व्हिडिओ 29 मार्च 2018 चा आहे. हा व्हिडिओ मुलगा जावेद जाफरीने ट्वीट केला होता. या व्हिडिओत ते म्हणाले होते की, हसत-हसत या आणि हसत-हसत जा.