यशराज फिल्म्सने थिएटर रिलीज डेट केली कन्फर्म; यंदाच्या वर्षात ५ नवे चित्रपट होणार प्रदर्शित

0
189

यशराज फिल्म्सनं आपल्या या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची घोषणा केली आहे. या वर्षी म्हणजे २०२१ साली यशराज फिल्म्सचे ५ बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. करोना प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटांचं चित्रीकरण तसंच प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं. पण आता हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.

यशराजचे 5 मोठे चित्रपट
ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना यशराज फिल्म्सने त्यांचे 5 मोठे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. यशराजने सोशल मीडियावर 2021 मध्ये प्रदर्शित होणा-या चित्रपटांची यादी शेअर केली आहे.

  • पहिला चित्रपट ‘संदीप और पिंकी फरार’ हा आहे. हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. दिबाकर बॅनर्जी हे दिग्दर्शक आहेत.
  • दुसरा चित्रपट ‘बंटी और बबली 2’ हा आहे. हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी रिलीज होईल. या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. तर शरवरी ही या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण व्ही शर्मा आहेत.
  • तिसरा चित्रपट म्हणजे ‘शमशेरा’. हा चित्रपट 25 जून रोजी रिलीज होईल. या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त हे मुख्य भूमिकेच आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे.
  • चौथा चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’ हा आहे. तो 27 ऑगस्ट रोजी रिलीज होईल. या चित्रपटात रणवीर सिंग, शालिनी पांडे, बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिव्यांग ठक्कर हे याचे दिग्दर्शक आहेत.
  • पाचवा चित्रपट ‘पृथ्वीराज’. हा चित्रपट 5 नोव्हेंबरला रिलीज होईल. अक्षय कुमार, सोनू सूद, संजय दत्त आणि मानुषी छिल्लर यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी हे आहेत.