बॉलीवूड अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

0
215

दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी (९ फेब्रवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्यावर्षी निधन झालेल्या ऋषी कपूर यांच्या कुटुंबाला मंगळवारी आणखी एक धक्का बसला. मंगळवारी सकाळी राजीव कपूर यांचा दिवस खूप चांगला सुरू झाला. मात्र नाष्टा झाल्यानंतर त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागलं. कुणाला सांगेपर्यंत त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

रणधीर कपूर यांनी धक्क्यात असताना ही माहिती दिली. ‘मी माझा सर्वात लहान भाऊ राजीवला गमावलं आहे. डॉक्टरांनी खूप मेहनत केली पण त्यांना वाचवू शकले नाहीत.’

राजीव कपूर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक होते. राजीव कपूर यांनी ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातून 1983 साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात ते मुख्य भूमीकेत दिसून आले होते. या शिवाय त्यांनी आसमान (1984), लवर बॉय (1985), जबरदस्त (1985) और हम तो चले परदेस (1988) चित्रपटात काम केले आहे. राजीव कपूर यांनी आ अब लौट चलें (1999), प्रेमग्रंथ (1996) और Henna (1991) या चित्रपटाचे निर्माते होते. प्रेमग्रंथ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.

  • राज कपूर यांचा सर्वात लहान मुलगा राजीव कपूर यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ मध्ये मुंबईत झाला. त्यांना चिंपू नावाने घरात हाक मारायचे.
  • १९८३ मध्ये ‘एक जान हैं हम’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
  • सिनेकरिअर फारसं न चालल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी आर्किटेक्ट आरती सब्बरवाल यांच्याशी लग्न केलं.
  • हे लग्न फारसं चाललं नाही. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.
  • यानंतर राजीव यांनी दुसरं लग्न केलं नाही. ते मोठे भाऊ रणधीर कपूर यांच्यासोबतच राहू लागले. राजीव यांना मुलं नाहीत.
  • राजीव यांच्या पश्चात त्यांचा मोठा भाऊ रणधीर कपूर आणि त्यांचं कुटुंबिय तसेच बहीण रिमा जैन आणि त्यांचं कुटुंब आहे. राजीव यांना कुटुंबासोबत जेवायला प्रचंड आवडायचं.
  • १९८५ मधील ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली.
  • अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्माते म्हणूनही काम पाहिलं. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. ‘आ अब लौट चले’ सिनेमाची निर्मिती त्यांनी केली.
  • राजीव कपूर यांना मेरा नाम जोकर हा सिनेमा इतका आवडायचा की, त्यांनी हा सिनेमा १५० हून जास्त वेळा पाहिला होता.