Birthday Special: कॉमेडीचा जादूगार अभिनेता अशोक सराफ

0
668

लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 73 वर्षे पूर्ण केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ते एक लोकप्रिय अभिनेते आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे मराठीतले सुपरस्टार आहेत.

४ जून १९४७ रोजी त्यांचा मुंबईतील चिखलवाडी येथे जन्म झाला. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. अशोक सराफ यांच्या वडिलांना त्यांनी शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करावी अशी इच्छा होती. पण त्यांच्या ध्यानीमनी मात्र फक्त अभिनयच होता. यावर उपाय म्हणून त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली.

अशोक सराफ यांच्या वडिलांचा इम्पोर्ट- एक्सपोर्टचा व्यवसाय होता. मुलाने चांगली नोकरी धरल्याचा त्यांना आनंद होता. पण अशोक यांच्या मनात मात्र अभिनयाशिवाय दुसरा कोणता विचार यायचा नाही. याचमुळे नोकरीत असताना त्यांनी नाटकात काम करून स्वतःचं स्वप्न जिवंत ठेवलं. अभिनयात आपलं स्थान बळकट करत असताना त्यांनी १० वर्ष नोकरीही केली.

सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला.वि.स. खांडेकरांच्या ‘ययाति’ या कादंबरीवर आधारित नाटकात त्यांनी भाग घेतला होता. या नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका केली होती. याच भूमिकेपासून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. यानंतर १९७१ मध्ये आलेला ‘दोन्ही घरचा पाहूणा’ सिनेमात भूमिका मिळाली. १९७५ मध्ये आलेल्या दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ने अशोक सराफ यांना ओळख मिळवून दिली.

अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. ‘हम पांच’ या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबरची त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. तसेच अशोक सराफ यांनी सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांबरोबरच्या नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांतून मराठी रसिकांना खिळवून ठेवले. ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं. 1, सिंगम ह्या काही हिंदी चित्रपटातही अशोक मामांनी उल्लेखनीय भूमिका निभावली.

अशोक सराफ यांना मामा का म्हटले जाते?

अभिनेते अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने अशोकमामा असे म्हणतात. मात्र अशोकमामा हे नाव कसे पडले यामागे एक रंजक कहाणी आहे. एका मुलाखतीत अशोक मामाचे नामकरण कशा पद्धतीने झाले, त्याचा एक किस्सा खुद्द अशोक सरफांनी सांगितला होता. ते म्हणाले होते, “काही वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबोरबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ… पण तू त्यांना अशोकमामा म्हणायचे आणि तेथूनच मला अशोकमामा म्हणायला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसांतच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारु लागले