Bollywood Drug Case: बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनमुळे हादरली

0
248

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. ड्रग्स कनेक्शन प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर येऊ लागली आहेत. अनेकांना अटक देखील करण्यात आले आहे. रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीची नावे समोर आली आहेत.

आजतक’च्या वृत्तानुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K हा कोडवर्ड समोर आला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये या नावांचा उलगडा झाला आहे. त्यानुसार D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा ही नावं समोर आली आहेत.

सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर जया साहा हिच्या KWAN या कंपनीची मॅनेजर करिश्माचे काही व्हॉट्स अ‍ॅप चॅट समोर आले आहेत. यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची नावं समोर आल्याचं दिसून येत आहे. यात नम्रता जयासोबत ड्रग्सविषयी चर्चा करताना दिसत आहे. या व्हॉट्स अ‍ॅप चॅटमध्ये “मुंबईमध्ये तू मला एमडी देशील आणि त्यानंतर आपण पार्टी करु, असं वचन तू मला दिलं होतंस. मला खरंच एका ब्रेकची गरज आहे”, असं N ने म्हटलं आहे. दरम्यान, यापूर्वी श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान या दिग्गज अभिनेत्रींचीदेखील नावं समोर आली आहेत.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रकुल प्रीतच्या चौकशी दरम्यान २०१९मध्ये करणच्या घरी झालेल्या पार्टीची माहिती मिळाली आहे. काल चार तास रकुल प्रीतची चौकशी करण्यात आली असून आज दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी होणार आहे.

बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलीच दहशत पसरली असून आता आणखी किती बड्या सेलिब्रिटींची नावे समोर येणार आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार याची चर्चा आता सर्वत्र चालली आहे.