झी मराठी अवॉर्ड्स २०२०-२१: कोणती मालिका ठरली सर्वोत्तम? कलाकारांच्या उपस्थितीत रंगला झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळा

0
351

झी मराठी वाहिनीवरील मालिकांच्या विश्वात आतुरतेने ज्या कार्यक्रमाची वाट पाहिली जाते त्या ‘झी मराठी अॅवॉर्ड, २०२०-२१ हा पुरस्कार सोहळा मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात मोठ्या दिमाखात आणि उत्साही वातावरणात झाला. या कार्यक्रमाला मराठी मनोरंजन सृष्टीतील बहुतांश सर्व कलाकार आवर्जून उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला. तसेच रेड कार्पेटवर सेलिब्रिटीजनी दिमाखदार पोषाखांत दमदार हजेरी लावली आणि सोहळा अजूनच रंगतदार केला.

नजर टाकुयात झी मराठी अवॉर्ड्स पुरस्कारांवर
माझा होशील ना या मालिकेतील ‘सई- आदित्य’ यांना ‘सर्वोत्कृष्ट जोडी’चा मान मिळाला, तर ‘माझा होशील ना’ ही मालिका ‘सर्वोत्कृष्ट मालिका’ ठरली, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ ‘सई’ म्हणजेच ‘गौतमी देशपांडे’ हिला मिळाला. तर ‘शाल्व किनजावडेकर’ला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’चा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट कुटुंब ब्रम्हे कुटुंब, ‘सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा’ कलाकार महिला देवमाणुस मालिकेतील ‘सरु आजी’ ठरली तर, ‘सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरे’खा कलाकार पुरुष विभागात ‘टोण्या’ला पुरस्कार मिळाला… ‘सर्वोत्कृष्ट खलनायक’- ‘डॉ. अजितकुमार देवमाणूस’, ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ ‘मालविका’ येवू कशी तशी मी नांदायला.

झी मराठी वाहिनीवरून प्रसारीत होणा-या ‘माझा होशील ना’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘देवमाणूस’, ‘अग्गबाई सासूबाई’, ‘काय घडलं त्या रात्री?’, ‘कारभारी लाईभारी’, ‘लाडाची मी लेक ग!’ या मालिकांमध्ये जोरदार चुरस होती. मराठी मनोरंजन विश्वातील तारे-तारकांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमाचे प्रसारण २८ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.